Health Tips : तिशीच्या टप्प्यावर द्या आरोग्याकडे लक्ष, योगासनांनी राहिल तब्येत तंदुरुस्त
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या मजबूत राहायचं असेल, तर दिनचर्येत योगासनं करायला सुरुवात करा. ताडासन, पश्चिमोत्तानासन, सेतुबंध सर्वांगासन, मलासन, बालासन यासारख्या योगासनांमुळे केवळ शरीर लवचिक आणि तंदुरुस्त राहत नाही तर मन शांत होतं आणि आत्मविश्वास वाढतो.

दिसायला सोपं असलेलं हे आसन शरीरासाठी महत्त्वाचं आहे. ताडासन केल्यानं शरीराची स्थिती सुधारते, पाठीचा कणा सरळ राहतो आणि संतुलन सुधारतं. हे आसन संपूर्ण शरीराला ताणण्यास मदत करतं, ज्यामुळे स्नायू ताणले जातात.

पश्चिमोत्तानासन हे एक अतिशय प्रभावी योगासन. पाठ, पाय आणि पोटासाठी हे आसन फायदेशीर आहे. या आसनात, शरीराला पुढे वाकवून पायांच्या बोटांना धरून ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या योगाभ्यासामुळे पाठीचा कणा मजबूत होतो.
advertisement

सेतुबंध सर्वांगासनाला ब्रिज पोझ असंही म्हणतात. पाठ आणि पोटासाठी हे आसन फायदेशीर आहे. हे आसन पाठीवर झोपून केलं जातं, ज्यात शरीर वर करून ब्रिजचा आकार तयार होतो.

मलासन विशेषतः महिलांसाठी फायदेशीर आहे. या आसनानं पेल्विक एरिया मजबूत होतो, कंबर आणि मांड्यांची ताकद वाढते आणि बद्धकोष्ठतेपासूनही आराम मिळतो.
advertisement

बालासनामुळे शरीर आणि मनाला आराम मिळतो. या योगासनामुळे ताण कमी होतो, पाठीच्या कण्याला आराम मिळतो आणि संपूर्ण शरीराला विश्रांती मिळते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 10:07 PM IST
मराठी बातम्या/फोटो गॅलरी/
Health Tips : तिशीच्या टप्प्यावर द्या आरोग्याकडे लक्ष, योगासनांनी राहिल तब्येत तंदुरुस्त