शिक्षण सोबत अन् व्यवसायही, 2 मित्रांची शेतकरी कंपनी, वर्षाला करतेय 6 कोटींची उलाढाल

Last Updated:
भंडारा जिल्ह्यातील दोन मित्रांनी सुरू केली शेतकरी कंपनी. शेतकऱ्यांना सोबत घेऊन व्यवसायात भरारी घेत आज त्यांनी 18 जणांना रोजगार मिळवून दिलाय. 
1/7
भंडारा जिल्ह्यातील सिंधपुरी येथे राहणारे दोन मित्र. पवन कटनकार आणि रवी रहांगडाले या दोघांचेही प्राथमिक शिक्षण गावातच झाले. त्यानंतर केमिकल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. पवन यांचे वडील शिक्षक आहेत तर रवी यांचे वडील शेतकरी आहेत.

advertisement
2/7
पवन आणि रवी यांची लहानपणापासूनची मैत्री आताही कायम आहे. या दोन उच्चशिक्षित तरुणांनी शेतकरी कंपनी स्थापन करून त्यातून अनेकांना रोजगार प्राप्त करून दिलाय. मैत्री फक्त म्हणायला नाही तर आयुष्याच्या सर्वात महत्त्वाच्या टप्प्यावर योग्य मार्गदर्शन करणारी आणि साथ देणारी असावी हे या दोन मित्रांच्या यशातून दिसून येते.

3/7
पवन आणि रवी यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला. तेव्हा ते सांगतात की, आम्ही दोघे लहानपणापासूनचे मित्र आहोत. शिक्षण सुद्धा आमचं सोबतच झालेलं. इंजिनिअरिंगनंतर आम्ही दोघांनी दोन वर्षे दोन वेगवेगळ्या कंपन्यांत काम सुद्धा केले. पण, मनात नेहमी विचार यायचा की, स्वतःचा व्यवसाय उभारावा. अशातच आम्ही 2015 मध्ये 3 लाखांची गुंतवणूक करून स्वप्नपूर्ती नावाने दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. पण 2016 मध्ये रवीला दुबई येथे नोकरीची संधी मिळाली. तेव्हा मग ती संधी सोडायची नाही म्हणून 2 वर्ष ती नोकरी सुद्धा केली. पण त्यात मन रमत नव्हतं. म्हणून 2018 मध्ये स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करण्याच्या उद्देशाने परत आलो, असे रवी सांगतात.

4/7
2015 मध्ये काही भांडवल वापरून 4 गाई विकत घेतल्या आणि स्वप्नपूर्ती या नावाने दुग्ध व्यवसायाची सुरुवात केलीच होती. त्यात हळूहळू वाढ करण्याचे ठरवले आणि जर्सी,एचएफ जातीच्या गायींची संख्या 100 पर्यंत गेली. त्यातून मिळणारे 300 ते 359 लिटर दूध 'तुमसर मिल्क' या संकलन केंद्राला पुरवले जात होते.

5/7
पुढे ते सांगतात की, गांडूळ खत, गोमूत्र व अन्य उत्पादनाची विक्री विविध कृषी प्रदर्शनातून करण्याचे आमचे नियोजन होते. मात्र त्यातील काही समस्या लक्षात आल्यानंतर सुरुवातीला परिसरातील शेतकऱ्यांना सोबत घेऊन स्वप्नपूर्ती शेतकरी दुग्ध उत्पादक समूहाची बांधणी केली. त्यानंतर 2021 मध्ये तुमसर ऑइल प्रोसेस फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना केली.

6/7
गोवंशावर आधारित उत्पादने : भूसुधारक खत, गांडूळ खत, फ्लोअर क्लिनर, धूपबत्ती, अगरबत्ती, डिशवॉश जैविक उत्पादने: ट्रायकोडर्मा, ह्युमिक ऍसिड, जैवखते जैविक उत्पादने: ट्रायकोडर्मा, ह्युमिक ऍसिड, जैवखते लाखांच्या गुंतवणुकीतून 6 कोटींची उलाढाल
गोवंशावर आधारित उत्पादने : भूसुधारक खत, गांडूळ खत, फ्लोअर क्लिनर, धूपबत्ती, अगरबत्ती, डिशवॉश जैविक उत्पादने: ट्रायकोडर्मा, ह्युमिक ऍसिड, जैवखते
advertisement
7/7
नागपूरला आम्ही कंपनीच्या नावाने छोटे दुकान भाडेतत्त्वावर घेतले आहे. तिथे दोन कर्मचारी नियुक्त करून दिले आहे. ते ऑर्डर घेऊन ग्राहकांना प्रॉडक्ट पुरवतात. ॲमेझॉनवर सुद्धा आमच्या कंपनीची उत्पादने मिळतात. दुसऱ्याकडे नोकरी न करता स्वतःच्या व्यवसायात लक्ष घालून आज आम्ही 18 लोकांना वर्षभरासाठी रोजगार दिलाय. कमी काळातच आमच्या या व्यवसायाची वार्षिक उलाढाल 6 कोटीपर्यंत गेली आहे, असेही रवी आणि पवन सांगतात.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement