IND vs AUS : 'मला काम करायची गरज वाटत नाही', वनडेचा कर्णधार बनताच गिल हवेत, विजयानंतर हे काय बोलून गेला
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला. कारण त्याने 3 सामन्यात फक्त 44 धावा केल्या होत्या. दरम्यान सामना संपल्यानंतर ज्यावेळेस त्याला त्याच्या फलंदाजीवर प्रश्न विचारण्यात आला.
India vs Australia News : ऑस्ट्रेलिया विरूद्धचा तिसरा वनडे सामना भारताने 9 विकेटसने जिंकला आहे.भारताच्या या विजयात रोहित शर्माने नाबाद 120 धावांची आणि विराट कोहलीने 69 धावांची नाबाद खेळी करून मोलाची भूमिका बजावली.हा सामना भारताने जिंकून ऑस्ट्रेलियाच्या हातून व्हाईटवॉश होण्यापासून स्वत:चा बचाव केला आहे.अशाप्रकारे ही मालिका 2-1ने सुटली. या मालिकेत टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल फलंदाजीत सपशेल अपयशी ठरला. कारण त्याने 3 सामन्यात फक्त 44 धावा केल्या होत्या. दरम्यान सामना संपल्यानंतर ज्यावेळेस त्याला त्याच्या फलंदाजीवर प्रश्न विचारण्यात आला.त्यावेळेस त्याने मला माझ्या बॅटींगवर काम करायची गरज वाटत नाही, असे उत्तर दिले आहे.त्याच्या उत्तरानंतर सगळ्यांच्या भुवय्या उंचावल्या आहेत.
advertisement
खरं तर शुभमन गिल या संपूर्ण मालिकेत फ्लॉप ठरला. पर्थमध्ये शुभमन गिलच्या बॅटीतून फक्त 10 धावा आल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या वनडेतही तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला आणि अवघ्या 9 धावांवर बाद झाला. तिसऱ्या वनडेत शुभमन गिलने रोहित शर्मासोबत डावाची चांगली सूरूवात केली. पण पुन्हा तेच मोठ्या धावा करताना अपयशी ठरला आणि तो अवघ्या 24 धावांवर अपयशी ठरला. त्यामुळे एकप्रकारे शुभमन गिलचे आकडे पाहता तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यात अपयशी ठरला.
advertisement
शुभमन गिलच्या या परफॉर्मन्सवर पत्रकारांनी विचारले असता तो म्हणाला, कधी कधी होतं असं, चांगली सुरूवात मिळते.पण नंतर चांगला शॉर्ट थेट हातात जातो. पहिल्या सामन्यात मी डाऊन द लेग आऊट झालो.पण मी माझ्या बॅटींगबद्दल इतका जास्त विचार करत नाही आहे. आणि बॅटींगवर मला काम करायची अशी गरज वाटत नाही आहे. पण कधी कधी होतं असं. प्रत्येक वेळी वाटतं की सगळ्यात सामन्यात खेळले पाहिजे.पण मला माझ्या परफॉर्मन्सची काळजी वाटत नाही, असे बोलून त्यांनी खळबळ उडवून दिली आहे. तसेच वनडेचा कर्णधार बनताच शुभमन गिल हवेत गेल्याचे बोलले जात आहे.
advertisement
ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारताचा टी20 संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार) तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर) वरुन चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षदीप राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर) रिंकु सिंग, वॉशिंग्टन सुंदर
advertisement
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
टी 20 मालिका
२९ ऑक्टोबर: पहिला टी२०, कॅनबेरा
३१ ऑक्टोबर: दुसरा टी२०, मेलबर्न
२ नोव्हेंबर: तिसरा टी२०, होबार्ट
६ नोव्हेंबर: चौथा टी२०, गोल्ड कोस्ट
८ नोव्हेंबर: पाचवा टी२०, ब्रिस्बेन
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 25, 2025 9:07 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs AUS : 'मला काम करायची गरज वाटत नाही', वनडेचा कर्णधार बनताच गिल हवेत, विजयानंतर हे काय बोलून गेला


