advertisement

Original Hapus: हापूस आंबा घेताना आता कुणीच फसवू शकणार नाही, देवगडच्या शेतकऱ्याने दिल्या टिप्स

Last Updated:
Origanal Hapus Mango: सध्या आंब्याचा सिझन असून कोकणातल्या हापूसला अनेकांची पसंती असते. परंतु, याच हापूसच्या नावाने फसवणूक होत असते. देवगडच्या शेतकऱ्याने खास टिप्स दिल्या आहेत.  
1/7
उन्हाळा सुरु झाला की फळांचा राजा मानला जाणाऱ्या आंब्याचा देखील सिझन सुरू होतो. बाजारात ठिकठिकाणी आंबे विक्रीसाठी उपलब्ध असतात. पण, आंबा म्हटलं की सर्वांना कोकणचा हापूसच आठवतो. त्यामुळे हापूस आंब्याची आवर्जून खरेदी केली जाते.

2/7
अनेकांना ओरिजनल हापूस आंबा आणि अन्य प्रकारातील आंब्यात फरक ओळखणे कठीण जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता असते. सध्या काही शेतकरी ‘GI टॅग’ मिळवून ही फसवणूक टाळण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काही वेळा GI टॅग नसलेला पण अस्सल हापूस आंबा सुद्धा बाजारात येतो, तर तो कसा ओळखण्याचा याबाबत देवगडच्या शेतकऱ्याकडूनच जाणून घेऊ.

3/7
देवगड हापूस आंब्याचा आकार हा नेहमीच विशिष्ट असा असतो. त्याचा वरचा भाग किंचित उंच तर देठाकडे खोलगट असतो, तर खालचा भाग निमुळता आणि गुळगुळीत असतो. याशिवाय त्याची साल खूपच पातळ असते आणि आतमधला गर केशरी रंगाचा व रसाळ असतो.

4/7
देवगड हापूस आंब्याला नैसर्गिक गोडसर सुवास असतो, जो तयार झाल्यावर लगेच जाणवतो. हापूस आंब्याचा स्वाद हा इतर आंब्यांच्या तुलनेत अधिक गोडसर, सुगंधी आणि ताजा असतो, असे देवगडचे शेतकरी उत्तम सावंत सांगतात.

5/7
सध्या देवगड आणि रत्नागिरी हापूसच्या नावाने ग्राहकांची मोठी फसवणूक होतेय. त्यासाठी कोकणचा हापूस जीआय टॅग लावून विकला जातोय. GI टॅग म्हणजे 'जिओग्राफिकल इंडिकेशन' जो विशिष्ट भागात पिकणाऱ्या उत्पादन ओळखीचं अधिकृत प्रमाणपत्र असतं.

6/7
जर शेतकऱ्यांना GI टॅग मिळवायचा असेल तर त्यांच्याकडे किमान 100 पेक्षा जास्त कलम केलेल्या आंब्याची झाडं असणं आवश्यक आहे. तसेच सातबारा उतारा देखील आवश्यक असतो. नोंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सुमारे सहा महिन्यात GI सर्टिफिकेट मिळते. त्यामुळे शेतकरी आणि ग्राहक दोघेही जागरूक होत आहेत.

7/7
सध्या देवगड हापूस आंब्याची बाजारात विक्री 700 ते 1200 रुपये प्रति डझन दराने होत आहे. त्यामुळे ओरिजनल हापूस ओळखूनच खरेदी करणे गरजेचे आहे, अशी माहिती शेतकरी उत्तम सावंत यांनी दिली आहे. (प्राची केदारी, प्रतिनिधी)

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement