एका कोकराला 3 लाखांचा भाव, 5 मेंढ्या पाळून डॉक्टर मालामाल, कसं झालं शक्य?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Priti Nikam
Last Updated:
Sheep Farming: सांगलीतील एका डॉक्टरांनी 5 शेळी आणि 5 मेंढ्या घेऊन व्यवसाय सुरू केला आहे. यातून त्यांना वर्षाला 5 लाखांची कमाई होतेय.
भरघोस अर्थिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी सांगलीच्या जत तालुक्यातील ‘माडग्याळी’ मेंढ्यांची प्रजात लोकप्रिय आहे. याच माडग्याळी मेंढ्यांसह देशी शेळ्यांचे पालन करून आटपाडीचे डॉक्टर लाखोंची कमाई करत आहेत. मच्छिंद्र पाटील असं या डॉक्टरांचं नाव असून ते गेल्या अनेक वर्षांपासून आटपाडी शहरामध्ये रुग्ण सेवा करतात.
advertisement
advertisement
advertisement
डॉ. मच्छिंद्र हे सकाळच्या वेळेमध्ये शेळ्या-मेंढ्यांना भरड, पेंड, मका खायला घालतात. त्यानंतर तीन तास मुक्त गोठ्यामध्ये सोडतात. तिथे शेळ्या-मेंढ्या त्यांच्या आवश्यकतेनुसार चारापाणी घेतात. दुपारच्या वेळेमध्ये गारव्यासाठी शेळ्या-मेंढ्यांना ओढ्याकाठी गवतावरती चरायला घेऊन जातात. सायंकाळी 5 वाजता मुक्त गोठ्यामध्ये सोडतात. चारापाणी देऊन रात्रीच्या वेळी बंदिस्त गोठ्यामध्ये त्यांना कोंडलं जातं.
advertisement
डॉ. मच्छिंद्र यांना दीड वर्षात माडग्याळी मेंढीपासून दोन चांगली पिल्ले मिळाली. एका पिलाची 1 लाख 85 हजार तर दुसऱ्या पिलाची 3 लाख रुपयांना विक्री झाली. याशिवाय शेळ्या-मेंढ्यांपासून मिळणाऱ्या शेणखताचा उपयोग डॉक्टर स्वतःच्या शेतीसाठी करतात. तसेच देशी शेळ्यांची पिले मांस विक्रीसाठी दिली जातात. 5 देशी शेळ्या आणि 5 माडग्याळी मेंढ्यांच्या पालनातून वर्षाकाठी 5 लाखांचा नफा मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.