आजची २९ ऑक्टोबर तारीख ठरणार सर्वात भाग्यशाली! २ जबरदस्त योग, ५ राशींकडे बक्कळ पैसा येणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 29 ऑक्टोबर 2025 हा दिवस अत्यंत शुभ आणि विशेष मानला जात आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, 29 ऑक्टोबर 2025 हा दिवस अत्यंत शुभ आणि विशेष मानला जात आहे. या दिवशी एकाच वेळी दोन प्रभावी योग तयार होत असल्याने काही राशींच्या जीवनात सकारात्मक बदल घडतील. या दिवसाचा परिणाम 12 पैकी 5 राशींवर अत्यंत लाभदायक होईल. आर्थिक क्षेत्रात सुधारणा, कामात यश, आणि वैयक्तिक आयुष्यात समाधान असे शुभ परिणाम या राशींना अनुभवायला मिळतील.
advertisement
29 ऑक्टोबरचे विशेष योग ज्योतिषशास्त्रानुसार, या दिवशी चंद्र आणि गुरू यांच्या संयोगामुळे केंद्र योग तयार होईल. तसेच बुध ग्रह सूर्यापासून दुसऱ्या घरात असल्याने साम योग आणि वेशी योग निर्माण होईल. मंगळ स्वतःच्या राशीत असल्याने रुचक राजयोग तयार होईल, तर उत्तराषाढा नक्षत्राच्या संयोगाने धृती योग निर्माण होणार आहे. या सर्व ग्रहयोगांमुळे 29 ऑक्टोबरचा दिवस मेष, कर्क, तूळ, मकर आणि मीन या पाच राशींसाठी अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे.
advertisement
मेष - या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींना आर्थिक लाभ होईल. सरकारी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे पदोन्नती किंवा नवे संधी मिळू शकतात. तुमची कार्यक्षमता आणि आत्मविश्वास वाढेल. कुटुंबात सुसंवाद आणि आनंदाचे वातावरण राहील. धाडसी निर्णय घेतल्यास त्याचे सकारात्मक परिणाम मिळतील. प्रवास लाभदायक ठरेल.
advertisement
कर्क - कर्क राशीसाठी हा दिवस उत्साह आणि यश घेऊन येईल. व्यावसायिक क्षेत्रात नवी संधी आणि आर्थिक लाभ संभवतो. एखादा प्रलंबित प्रकल्प पूर्ण होईल, ज्यामुळे समाधान मिळेल. भागीदारीत काम करणाऱ्यांना नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन वाहन किंवा विलासाच्या वस्तू मिळू शकतात. कुटुंबीय आणि सहकाऱ्यांकडून तुम्हाला अपेक्षित पाठिंबा मिळेल.
advertisement
तूळ - राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत आनंददायी ठरेल. शुभ बातम्या मिळतील आणि जुनी इच्छा पूर्ण होईल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी प्रशंसा आणि लाभ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. विवाहयोग असणाऱ्यांसाठी हा दिवस अनुकूल राहील. अचानक आर्थिक लाभही मिळू शकतो.
advertisement
advertisement
मीन - मीन राशीच्या लोकांसाठी हा दिवस शुभ फळ देणारा ठरेल. व्यवसायात वाढ आणि नफ्याच्या नव्या संधी निर्माण होतील. हरवलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगती आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. प्रेमसंबंध दृढ होतील आणि कौटुंबिक वातावरण रोमँटिक राहील. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे.


