30 वर्षांनी आलाय भयानक योग! या राशींवर कोसळणार संकटांचा डोंगर, या घटना घडणार

Last Updated:
Samsaptak Yog 2025 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या ग्रहांची एक अत्यंत दुर्मीळ आणि प्रभावी अशी स्थिती निर्माण झाली आहे.
1/6
राशी भविष्य
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, सध्या ग्रहांची एक अत्यंत दुर्मीळ आणि प्रभावी अशी स्थिती निर्माण झाली आहे. मंगळ ग्रह बुधाच्या कन्या राशीत प्रवेश करत असताना, तिथे राहू आधीच विराजमान आहे. दुसरीकडे, शनि महाराज मीन राशीत वक्री अवस्थेत आहेत. या दोन ग्रहांमधील दृष्टिसंपर्कामुळे 'समसप्तक योग' तयार झाला आहे. विशेष म्हणजे, असा योग तब्बल 30 वर्षांनंतर पुन्हा निर्माण झाला आहे.
advertisement
2/6
राशी भविष्य
समसप्तक योग म्हणजे दोन ग्रहांमध्ये सप्तम दृष्टिसंबंध असणे. मंगळ आणि शनी हे दोघेही प्रभावशाली व कठोर परिणाम करणारे ग्रह मानले जातात. त्यामुळे त्यांच्यातील समसप्तक योग काही राशींवर विशेष परिणाम घडवून आणू शकतो. ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा या योगाचा परिणाम चार राशींवर विशेषतः जाणवेल आणि हा काळ त्यांच्या दृष्टीने कठीण ठरू शकतो.
advertisement
3/6
वृषभ राशी
वृषभ राशी -   मंगळ आणि शनीमुळे वृषभ राशीतील लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरणार आहे. आर्थिक व्यवहारात विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक अथवा खरेदी टाळावी. नातेवाईकांशी वाद टाळा आणि कोणत्याही वादग्रस्त गोष्टींमध्ये सहभागी होऊ नका. निर्णय घेण्याआधी सखोल विचार करणे आवश्यक आहे.
advertisement
4/6
मिथुन राशी
मिथुन राशी -   या राशीसाठी समसप्तक योग वैवाहिक आणि व्यावसायिक आयुष्यात अडथळे निर्माण करू शकतो. पती-पत्नीमध्ये मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये मानसिक तणाव वाढू शकतो. व्यवसायात अडथळे, गोंधळ आणि निर्णयाच्या चुकांची शक्यता निर्माण होईल. या काळात संयम राखा आणि कोणत्याही मोठ्या आर्थिक निर्णयापासून दूर रहा.
advertisement
5/6
सिंह राशी
सिंह राशी-   सिंह राशीच्या व्यक्तींनी आरोग्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. जिव्हाळ्याच्या नात्यांमध्ये गैरसमज वाढू शकतात. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तणावपूर्ण संबंध निर्माण होऊ शकतात. कामाचा ताण वाढल्याने मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. या काळात कुणालाही उधार देणे टाळावे.
advertisement
6/6
वृश्चिक राशी
वृश्चिक राशी -  मंगळ-शनी समसप्तक योगामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना अनेक आव्हानांना तोंड द्यावे लागेल. आर्थिक खर्च अनपेक्षितपणे वाढू शकतात. जवळच्या व्यक्तींशी मतभेद निर्माण होण्याची शक्यता आहे. व्यवहारात पारदर्शकता ठेवा, अन्यथा नाव खराब होण्याची शक्यता आहे. विशेषतः सरकारी कागदपत्रे, व्यवहार आणि कायदेशीर बाबतीत दक्षता घ्या.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement