Aajache Rashibhavishya: तुमच्या कष्टाचं चीज होणार, पण ती चूक भोवणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: शनिवार, 12 जुलैचा दिवस करिअर, प्रेम आरोग्य आणि वैयक्तिक जीवनाशी संबंधित बाबीत तुमच्या राशीसाठी कसा असेल? हे राशीभविष्यच्या माध्यमातून जाणून घेऊ.
मेष राशी: आज तुम्ही मानसिकदृष्ट्या शांत राहाल. त्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची पुरेपूर शक्यता आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे कौतुक होईल आणि यश मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत नवीन गुंतवणुकीचे निर्णय फायदेशीर ठरू शकतात. प्रेमजीवनात जोडीदारासोबत रोमँटिक क्षण अनुभवाल. आरोग्य चांगले राहील, पण खाण्यापिण्याकडे लक्ष द्या. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
वृषभ राशी: आज धन तुमच्या हातात टिकणार नाही, तुम्हाला धन संचय करण्यात आज खूप समस्यांचा सामना करावा लागू शकतो. नोकरीत बदलाची योजना आखत असाल, तर आज पावले उचलण्यासाठी योग्य वेळ आहे. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. प्रेमजीवनात जोडीदारासोबतच्या गैरसमज दूर होतील. आर्थिकदृष्ट्या सामान्य दिवस आहे, पण खर्चावर नियंत्रण ठेवा. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
मिथुन राशी -एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. स्थावर जंगम मालमत्ता गुंतवणूक लाभदायी ठरेल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
कर्क राशी -मित्र तुमच्या खुल्या मनाची आणि सहनशक्तीची परीक्षा पाहतील. पण तत्त्वांना शरण न जाता, विवेकी निर्णय घेण्याची खबरदारी घ्या. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे परंतु, या सोबतच तुम्ही दान-पुण्यही केले पाहिजे कारण यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल. आजच्या सायंकाळी काहीतरी खास योजना आखा. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
सिंह राशी -तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. आपल्या मुलांबरोबरचे आपले नातेसंबंध निकोप असू द्यात. भूतकाळ बाजूला सारून उज्ज्वल आणि आनंदी भविष्याकडे लक्ष असू द्या. तुमच्या प्रयत्नांना चांगले फळ मिळेल. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
कन्या राशी -मानसिक, नैतिक शिक्षणाबरोबरच शारीरिक शिक्षण घेणेही संपूर्ण विकासासाठी आवश्यक ठरते. आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खूपच गरजेचे असेल तर, देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की, तो पैसे परत केव्हा करेल. तुमच्या घरातील स्थितीचा काही अंशी अंदाज बांधता येणार नाही. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
तुळ राशी -तुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. आज अधिक धन खर्च करावे लागू शकते. यामुळे तुमची आर्थिक स्थिती बिघडेल. अनोखा नवा रोमान्स तुमचा उत्साह वाढवणारा आणि तुमचा मूड उल्हसित करणारा असेल. प्रवास केल्याने ताबडतोब निकाल मिळणार नाहीत परंतु त्यामुळे भविष्यातील नफा मिळण्यासाठी चांगला पाया तयार होईल. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी -ज्येष्ठांनी त्यांच्या जास्तीच्या ऊर्जेचा वापर सकारात्मक गोष्टींसाठी करून त्याचा चांगला लाभ घ्यावा. आपल्या पालकांनी केलेल्या मदतीमुळे आर्थिक अडचणींवर मात करणे शक्य होईल. त्यांचा योग्य सल्ला हा आपल्या भविष्यासाठी लाभदायक ठरणार आहे. थोडेसे अधिक प्रयत्न केलेत तर आजचा दिवस तुमच्या वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असेल. लग्नाची मागणी आज या राशीच्या लोकांसोबत होऊ शकते. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
advertisement
मकर राशी -तुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. दिवसाची सुरुवात जरी चांगली असली तरी, संध्याकाळच्या वेळी कुठल्या कारणास्तव तुमचे धन खर्च होऊ शकते ज्यामुळे तुम्ही चिंतित व्हाल. जर तुम्ही आपल्या घरापासून बाहेर राहून अध्ययन किंवा नोकरी करतात तर, आजच्या दिवशी तुम्हाला यश प्राप्ती करून देणारा असणारा आहे. ज्या साठी तुम्ही बाहेर राहत आहे त्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आजचा दिवस शुभ आहे. आज तुमचा शुभ अंक 5 आणि रंग हिरवा असणार आहे.
advertisement
कुंभ राशी -अत्यंत व्यस्त दिवस असला तरी आरोग्य चांगले राहील. आपल्या पुढील पिढीसाठी विशेष नियोजन करा. आपण आखलेल्या योजना तुम्ही पार पाडू शकाल, उद्दीष्ट गाठू शकाल अशा वास्तववादी असतील याची काळजी घ्या. लग्न म्हणजे केवळ एक छताखाली राहणं नव्हे. एकमेकांसोबत वेळ घालवणंही तेवढंच महत्त्वाचं असते. हातात घेतलेले कामे आज मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा आहे.
advertisement
मीन राशी -काही जणांसाठी प्रवास केल्याने थकून जाल आणि तणाव वाढला तरी आर्थिकदृष्ट्या फायद्यात राहाल. आज तुम्ही केलेले चांगले कृत्य तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीसमोर चमकवेल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement