Aajache Rashibhavishya: खूप खस्ता खाल्ल्या! आता राग, लोभ सोडा अन् सुखाशी नातं जोडा, आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: बुधवार, 9 जुलैचा दिवस काही राशींसाठी खास तर काहींसाठी नवी आव्हाने घेऊन येणार आहे. तुमच्या राशींचं आजचं राशीभविष्य जाणून घेऊ.
मेष राशी - तुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. प्रदीर्घ काळापासून सुरू असलेली भांडणे आजच सोडवा. प्रवासामुळे तुम्हाला नवीन ठिकाणे पाहायला मिळतील आणि महत्त्वाच्या व्यक्तींशी गाठभेट होईल. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
वृषभ राशी - आज तुम्ही करमणुकीत रमाल. या राशीतील काही लोकांना आज संतान पक्षाकडून आर्थिक लाभ होण्याची अपेक्षा आहे. आज तुम्हाला आपल्या मुलांवर गर्व वाटेल. प्रेमानेच प्रेम वाढते हे कायम लक्षात ठेवा. आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. प्रवासाच्या काही योजना असतील तर त्या ऐनवेळी पुढे ढकलाव्या लागतील. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. ताणतणाव, दडपणाच्या काळावर मात करता येईल. करिअरविषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा सर्वोत्तम दिवस असेल. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
कर्क राशी - आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे तर आज तो तुम्हाला तो पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवी आघाडी सुरू करण्यासाठी शुभ दिवस. पैसा, प्रेम, कुटुंब यापासून दूर होऊन आज तुम्ही आनंदाच्या शोधात कुठल्या आध्यात्मिक गुरूंसोबत भेटायला जाऊ शकता. हातातील कामे मार्गी लागतील. आज तुमचा शुभ अंक 2 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
सिंह राशी - आपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. आज तुम्हाला खूप धन खर्च करावे लागू शकते ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. जवळील व्यक्तीसोबत परिस्थिती अधिक वाईट बनण्याच्या आधी मतभेद दूर करण्यासाठी संवाद साधा. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
कन्या राशी - पूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. नवीन करार लाभदायक वाटण्याची शक्यता आहे, पण तुमच्या अपेक्षेप्रमाणे लाभ होण्याची शक्यता कमी आहे. पैसे गुंतवताना घाईगडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. आज तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
तूळ राशी - तुमच्यातील मूल जागे होईल आणि तुम्ही एकदम खेळीमेळीच्या मूडमध्ये जाल. जे लोक पैशाला आतापर्यंत विनाकारण खर्च करत होते, आज त्यांनी आपल्यावर काबू ठेवला पाहिजे आणि धनाची बचत केली पाहिजे. सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे. काहीजणांची व्यावसायिक प्रगती होईल. विवाहित लोकांसाठी आजचा दिवस उत्तम असा जाणार आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. आज तुम्ही कुठली नवीन गोष्ट जसे की वाहन, जमीन अशा गोष्टी घेऊ शकता. या साठी आज तुमचा दिवस शुभ आहे. विद्यार्थी आज आपल्या क्षेत्रात यश प्राप्त करणार आहेत. आज तुमचा शुभ अंक 3 आणि रंग पिवळा असणार आहे.
advertisement
धनु राशी - आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा. अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. आपले धन संचय करण्यासाठी आज आपल्या घरातील लोकांसोबत तुम्हाला बोलण्याची आवश्यकता आहे. तर लग्न ही तुमच्या आयुष्यात घडलेली सर्वात उत्तम घटना आहे, याची प्रचिती तुम्हाला येईल. राहिलेली कामे आज मार्गी लागतील. जमिनी बद्दलचे काही व्यवहार आज पूर्ण होतील. अविवाहित लोकांना आज आनंदाची बातमी मिळू शकते. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
मकर राशी - कामामध्ये मर्यादेपलीकडे स्वत:ला खेचू नका, योग्य ती विश्रांती घेण्याची आठवण ठेवा. आज तुमची काही चल संपत्ती चोरी होऊ शकते म्हणून, जितके शक्य असेल, याची काळजी घ्या. तुमच्या जोडीदाराच्या कुटुंबातील सदस्यांच्या हस्तक्षेपामुळे तुमचा दिवस अस्वस्थतेत जाईल. व्यावसायिक उद्दीष्टे गाठण्यासाठी आपली ऊर्जा योग्य प्रकारे वळविण्यास अत्यंत योग्य काळ आहे. या राशीतील विद्यार्थी विद्यार्थिनी आज आपल्या किमती वेळेचा दुरुपयोग करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
कुंभ राशी - देणगी आणि धर्मादाय कामामध्ये स्वत:ला गुंतवा, त्यातून तुम्हाला मन:शांती लाभेल. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ तारे यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. आपल्या बोलण्यामुळे काही लोकांचे मन नाराज होऊ शकते याची काळजी घ्या. कामानिमित्त अचानक प्रवास करण्याचा योग आहे. यामुळे थकवा जाणवेल. आज कोणतेही महत्त्वाचे कामे हाती घेऊ नका. तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
मीन राशी - दिवसाची सुरुवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. तुमच्या संकल्पना अपयशी ठरणार नाहीत याची खात्री होत नाही तोपर्यंत त्या कोणालाही सांगू नका. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराने केलेल्या प्रेमाच्या वर्षावामुळे आयुष्यातील सगळे कष्ट विसरून जाल. आज तुम्हाला तुमचा जुना मित्र भेटू शकतो ज्यामुळे तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील.
advertisement