Aajache Rashibhavishya: अनपेक्षित घबाड मिळणार, शनिवारी या राशींचं नशीब पालटणार, मेष ते मीन आजचं राशीभविष्य
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Kunal Santosh Dandgaval
Last Updated:
Horoscope Today: ज्योतिषशास्त्रामध्ये ग्रह आणि नक्षत्रांच्या आधारे भविष्याविषयी माहिती दिली जाते. ज्योतिषशास्त्रात एकूण 12 राशी असून तुमच्या राशीसाठी आजचा शनिवार कसा असेल? जाणून घेऊ.
मेष राशी -एखादा मित्र किंवा जुजबी ओळख असलेल्या व्यक्तीच्या स्वार्थी वागणुकीमुळे तुमची मन:शांती गमावून बसाल. आज घरातून बाहेर जाताना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा, यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. कर्मकांडे घरच्या घरीच करणे हिताचे ठरेल. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. आजचा तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
वृषभ- आजच्या दिवशी तुम्ही आराम करू शकाल. आज तुम्हाला आपल्या संतानमुळे आर्थिक लाभ होण्याची शक्यता दिसत आहे. यामुळे तुम्हाला बराच आनंद होईल. जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी व शांतता नांदेल. आजच्या दिवशी तणावाने मुक्त राहण्याचा प्रयत्न करा, आणि आराम करण्याचा प्रयत्न करा. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
मिथुन राशी - प्रवास करण्यासाठी तुमची प्रकृती चांगली नाही म्हणून लांबचे प्रवास टाळा. आजच्या दिवशी समोर येणारे गुंतवणुकींचे नवे पर्याय धुंडाळा, पण प्रकल्पाची व्यावहारिकता सखोलपणे अभ्यासल्यावरच आपला सहभाग जाहीर करा. बोलवा. तुमचे कौतुक करणारे अनेकजण असतील. आजच्या दिवशी तुम्ही प्रेमपाशात बांधले जाणार आहात. आज तुमचा शुभ अंक 6 आणि रंग गुलाबी असणार आहे.
advertisement
कर्क राशी - तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. ज्या लोकांनी जमीन खरेदी केली होती आणि आता त्या जमिनीला विकण्याची इच्छा आहे, तर आज कुणी चांगला व्यापारी मिळू शकतो आणि जमीन विकून त्यांना चांगला लाभ ही होऊ शकतो. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. आज तुमचा शुभ अंक 1 आणि रंग नारंगी असणार आहे.
advertisement
सिंह राशी -आज तुम्हाला आशादायी वातावरण अनुभवास येईल. आज तुम्ही आपल्या घरातील वरिष्ठ लोकांकडून पैशाची बचत करण्याला घेऊन काही सल्ला घेऊ शकतात आणि त्या सल्ल्याला आयुष्यात महत्त्व ही देऊ शकतात. आज तुमच्या कृतीमुळे तुमच्यासोबत राहात असलेली व्यक्ती प्रचंड त्रासून जाईल. आर्थिक लाभ होणार. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
कन्या राशी - आज आर्थिक पक्ष चांगले राहील परंतु, यासोबतच तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही आपल्या धनाला व्यर्थ खर्च करू नका. आपल्या जीवनसाथीचे आरोग्य हे तणावाचे आणि चिंतेचे कारण ठरू शकेल. कर्मचाऱ्यांना नोकरीत बढती किंवा आर्थिक फायदा मिळेल. आज तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाची प्रशंसा करतील. आज तुमचा शुभ अंक 7 आणि रंग पांढरा असणार आहे.
advertisement
तूळ राशी - आपल्या कुटुंबियांच्या अपेक्षांना योग्य न्याय देता येईल असे काही तरी करणे गरजेचे आहे. कार्यक्षेत्रात किंवा व्यवसायात तुमचा निष्काळजीपणा आज तुम्हाला आर्थिक नुकसान देऊ शकतो. कुटुंबियांसमवेत शांत आणि स्थिर दिवसाचा आनंद घ्या. इतर लोक त्यांचे प्रश्न घेऊन तुमच्याकडे आले तर त्याकडे दुर्लक्ष करा, त्यांना तुमच्या मानसिक स्थितीला धक्का लावू देऊ नका. आज तुमचा शुभ अंक 9 आणि रंग लाल असणार आहे.
advertisement
वृश्चिक राशी - आज तुम्ही सहजपणे भांडवल उभे कराल, राहिलेली देणी परत मिळवाल - किंवा नवीन प्रकल्पांसाठी निधी मागाल. तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या लोकांशी बोलताना तुम्हाला तुमचे मुद्दे मांडण्यात खूप अडचणी येतील. आज तुम्हाला प्रवासाचा योग आहे आणि त्यासाठी कंटाळा तुम्ही करू शकतात. आज तुमचा शुभ अंक 8 आणि रंग काळा असणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
कुंभ राशी - आपल्यासाठी काय चांगले आहे हे फक्त तुम्हाला स्वत:लाच माहीत आहे. त्यामुळे ठामपणाने, धाडसी आणि जलद निर्णय घेऊन परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवा. तुमच्या योजनांबद्दल सर्वत्र बडबड कराल तर त्यामुळे तुमचा प्रकल्प रखडेल, बारगळेल. कुठल्या नवीन कामासाठी तुम्हाला आज त्याच्या बाबतीत अनुभवी लोकांसोबत बोलणी केली पाहिजे. आज तुमचा शुभ अंक 4 आणि रंग करडा असणार आहे.
advertisement
मीन राशी -तुमची प्रकृती सुधारा आणि चांगले आयुष्य जगण्यासाठी संपूर्ण व्यक्तिमत्व बदलण्याचा प्रयत्न करा. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी तुम्ही आपल्या व्यवसायाला नवीन उच्चता देऊ शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. नको त्या गोष्टी बोलणे टाळा. आज तुमचा शुभ अंक ७ तर रंग पांढरा आहे.
advertisement