Numerology: शुक्रवार अनपेक्षित सुखावणारा! या जन्मतारखा असणाऱ्यांना मिळणार डबल सरप्राईज
- Published by:Ramesh Patil
- Written by:Chirag Daruwalla
Last Updated:
Numerology Marathi: ज्योतिषशास्त्राप्रमाणेच अंकशास्त्रही महत्त्वाचं असतं. अंकशास्त्रात आपल्या जन्मतारखेवरून भविष्य वर्तवलं जातं. अंकशास्त्रानुसार 27 सप्टेंबर 2024 चा दिवस कोणासाठी कसा असेल, त्याबद्दल ज्योतिषी चिराग दारूवाला यांनी सांगितलेलं भविष्य जाणून घ्या.
नंबर 1 (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19, 28 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)कोठेही गैरसमज होणार नाही, याची काळजी घ्या. कारण गैरसमज झाला तर तो दूर होण्यास वेळ लागेल. जीवनात सुखसोयी मिळाव्यात अशी इच्छा असेल. डोकेदुखी आणि तापाची समस्या जाणवू शकते. परदेशातून सहकार्य मिळवण्यासाठी किंवा गुंतवणुकीसाठी योजना आखत असाल तर तुमची निराशा होऊ शकते. या गोष्टी पुढे ढकलल्या जातील. जीवनात सध्याच्या नातेसंबंधाबाहेर नवीन उत्साह शोधाल. जोडीदाराचं मन दुखावलं जाणार नाही, याची काळजी घ्या.Lucky Number : 15Lucky Colour : Turquoise
advertisement
नंबर 2 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20, 29 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)अध्यात्माविषयी रुची वाढेल. तुम्ही चिंताग्रस्त असाल. एखाद्याकडून मदत घेताना सावधगिरी बाळगा, कारण फसवणूक होण्याची शक्यता जास्त आहे. व्यवसायात कर्ज देणे टाळा. प्रेमजीवनात सुरुवातीला काही अडथळे येतील आणि नंतर रोमान्स सुरळीत होईल.Lucky Number : 7Lucky Colour : Baby Pink
advertisement
नंबर 3 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21, 30 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)दिवस साहस आणि उत्साह वाढवणारा आहे. मनात असंतोषाची भावना राहील. शत्रूने कितीही प्रयत्न केले तरी तो तुमचं नुकसान करू शकणार नाही. दूरच्या ठिकाणाहून अपेक्षित पैसे मिळतील. प्रेमजीवनात सौम्य असलेला रोमान्स नंतर अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो.Lucky Number : 1Lucky Colour : Forest Green
advertisement
नंबर 4 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22, 31यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)तुमचा एखाद्या गोष्टीवरून गैरसमज होईल. एकटेपणा वाटेल. तुम्ही आनंदी असाल आणि आजूबाजूच्या लोकांचे मनोरंजन कराल. विरोधक सक्रिय असतील. त्यामुळे सावध राहा. पैसे सहज कमवाल. पण भविष्यासाठी बचत करा. प्रेमाशिवाय जीवन नाही, नात्यात सुधारणा केली पाहिजे असं तुम्हाला वाटेल.Lucky Number : 3Lucky Colour : Rose
advertisement
नंबर 5 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 5, 14, 23 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)कौटुंबिक वातावरण सामान्य असेल. तुमचं नातं वेळोवेळी अधिक अर्थपूर्ण होईल. स्वभावावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे आराम करा. नवीन व्यावसायिक भागीदारीसाठी दिवस चांगला आहे. दीर्घकाळ प्रशंसा केलेल्या एखाद्या व्यक्तीशी सखोल आणि अर्थपूर्ण नातं तयार करण्याची संधी मिळेल.Lucky Number : 11Lucky Colour : Pink
advertisement
नंबर 6 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 6, 15, 24 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)प्रयत्न आणि तडजोड करण्याची इच्छा असूनही कौटुंबिक जीवन विस्कळित राहील. बाहेर जेवायला जाल. तुम्हाला दातांच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागू शकतो. करिअरमध्ये नॉलेज आणि बुद्धिचा वापर करत पुढे जा. महत्त्वाच्या दिवसाची योजना आखण्यासाठी दिवस चांगला आहे.Lucky Number : 9Lucky Colour : Turquoise
advertisement
नंबर 7 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 7, 16, 25 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सावधपणे व्यवहार करा. कारण यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो. तुम्ही आनंदी असाल आणि आसपासच्या लोकांचे मनोरंजन कराल. तुम्ही प्रतिस्पर्ध्यांच्या यादीत अव्वल स्थानावर असाल. व्यवसायात लाभ होईल आणि तुम्ही चांगला नफा कमवाल. जोडीदाराच्या जीवनात बदल घडवण्याची संधी मिळेल.Lucky Number : 8Lucky Colour : White
advertisement
नंबर 8 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17, 26 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)समवयस्क व्यक्तींसोबत तुम्ही आनंदी राहाल. काही लोक तुमच्याविरूद्ध कट रचत आहेत, असं तुम्हाला वाटेल. मनातील इच्छा चिकाटीच्या जोरावर पूर्ण करण्यासाठी दिवस चांगला आहे. दिवस खर्च वाढवेल. कारण तुम्हाला परदेशातील संभाव्य ग्राहकांसाठी काही पैसे खर्च करावे लागतील. जोडीदाराच्या मताशी असहमत असला तरी त्याचं किंवा तिचं म्हणणं काळजीपूर्वक ऐका. कारण जीवन एक तडजोड आहे.Lucky Number : 1Lucky Colour : Light Yellow
advertisement
नंबर 9 : (तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18, 27 यांपैकी कोणत्याही तारखेला झाला असेल, तर हे भविष्य तुम्हाला लागू होतं.)दिवस तुमच्यासाठी व्यावसायिकदृष्टीनं अत्यंत स्मरणीय ठरेल. अनपेक्षित मतभेदामुळे हे काय आणि का होत आहे, असा प्रश्न पडेल. मानसिक ऊर्जा कमी असेल. व्यावसायिक शत्रुत्वाचा सामना करावा लागेल. पण त्याचा वापर तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी करून घेऊ शकता. प्रेम जीवनात सौम्य असलेला रोमान्स नंतर अधिक अर्थपूर्ण होऊ शकतो.Lucky Number : 18Lucky Colour : Saffron