Weekly Horoscope: धनु, मकर, कुंभ, मीन राशींचे साप्ताहिक राशीभविष्य; जबरदस्त परतावा कोणाच्या नशिबी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
July Weekly Horoscope: जुलैच्या नव्या आठवडा सण-उत्सवांची रेलचेल आहे. सोमवारी एकादशी असून गुरुवारी गुरुपुष्यामृत आणि शुक्रवार पासून श्रावण महिना सुरू होत आहे. काही राशींच्या लोकांसाठी आठवठा भाग्यदायी ठरू शकतो. आठवड्यातील एकंदरीत ग्रहस्थितीचा राशीचक्रावरील परिणाम जाणून घेऊ.
धनु - हा आठवडा धनु राशीच्या लोकांसाठी नवीन सुरुवात असू शकतो. नवीन प्रकल्प किंवा कामासाठी ठोस योजना आखली जाईल. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. पैशाची आवक होईल. कौटुंबिक जीवनात काही गोष्टींबद्दल वाद होऊ शकतो, परंतु तुम्ही या गोष्टी हुशारीने हाताळू शकाल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा राहील. विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळेल. आठवड्याच्या शेवटी धार्मिक स्थळांना भेट दिली जाण्याची शक्यता आहे. कामात चांगली ऊर्जा राहील.
advertisement
मकर - मकर राशीच्या लोकांसाठी आठवड्याची सुरुवात थोडी मंद असू शकते, परंतु हळूहळू वेग वाढेल. कामात नीट लक्ष द्यावं लागेल आणि घाईघाईने निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबींमध्ये सावधगिरी बाळगा, एखाद्यावर जास्त विश्वास ठेवणं हानिकारक ठरू शकतं. कौटुंबिक जीवन या आठवड्यात ठीक राहील, परंतु आई-वडिलांच्या आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. प्रेमात असलेल्यांना काही नवीन अनुभव येतील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ आव्हानात्मक ठरू शकतो. आरोग्य ठीक असेल, परंतु मायग्रेन किंवा डोकेदुखी तुम्हाला त्रास देऊ शकते.
advertisement
कुंभ - या आठवड्यात ठरवलेल्या योजना राबविण्याचा काळ आहे. कामात तुम्हाला काही मोठी जबाबदारी मिळू शकते. सहकाऱ्यांशी सुसंवाद ठेवावाच लागेल. हा काळ आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे आणि काही जुनी गुंतवणूक चांगली परतफेड देऊ शकते. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. प्रेम जीवन खास असेल. आठवड्याच्या शेवटी तुम्हाला जुना मित्र भेटू शकतो. आरोग्य चांगले राहील परंतु डोळ्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
advertisement
advertisement