लक्ष्मीनारायण योग येणार! या 3 राशींचे लोक मालामाल होणार, पैशांचा पाऊस पडणार
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Shukra and Budh Yuti : ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना खूप महत्त्व दिलं जातं. ग्रहांचे राशी व नक्षत्रांमधील स्थान बदलल्यामुळे विशिष्ट योग तयार होतात आणि त्यांचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो.
ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालींना खूप महत्त्व दिलं जातं. ग्रहांचे राशी व नक्षत्रांमधील स्थान बदलल्यामुळे विशिष्ट योग तयार होतात आणि त्यांचा थेट परिणाम आपल्या जीवनावर होतो. अशाच एका महत्त्वाच्या ग्रह संयोगाची निर्मिती येत्या 21 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजून 25 मिनिटांनी होणार आहे. या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीत प्रवेश करणार असून, या राशीत बुध ग्रह आधीच विराजमान आहे. या दोन ग्रहांच्या एकत्र येण्यामुळे ‘लक्ष्मीनारायण योग’ तयार होईल, जो 30 ऑगस्टपर्यंत प्रभावी राहणार आहे.
advertisement
advertisement
कर्क राशी - कारण लक्ष्मीनारायण योग कर्क राशीतच तयार होत आहे, त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना या काळात मोठे लाभ मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक संकटातून सुटका होईल. अडकलेली कामे पूर्ण होतील. आत्मविश्वासात लक्षणीय वाढ होईल. व्यवसायात किंवा नोकरीत मोठी संधी मिळेल. पदोन्नतीचे योग निर्माण होतील. कौटुंबिक जीवनात सुख, शांतता आणि आनंदाचे वातावरण असेल.
advertisement
तूळ राशी - शुक्र आणि बुध यांची युती तूळ राशीसाठीही अत्यंत फलदायी ठरणार आहे. व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल होतील. समाजात मान-सन्मान वाढेल. कौटुंबिक वातावरण सौख्यदायक राहील. आर्थिक स्थैर्य आणि शुभ कार्यांचे आयोजन होईल. आरोग्य चांगले राहील, जुन्या तक्रारी दूर होतील. परदेशगमनाचे किंवा मोठ्या प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक जीवनात जवळीक आणि प्रेम वाढेल.
advertisement
वृश्चिक राशी - वृश्चिक राशीच्या व्यक्तींनाही हा कालखंड संधींनी भरलेला ठरणार आहे. नोकरी किंवा व्यवसायात यश मिळेल. नवीन गुंतवणूक फायदेशीर ठरेल. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांना यश प्राप्त होईल. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. अविवाहितांना लग्नाचे योग्य प्रस्ताव मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल होतील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल.