Numerology: मोबाईल नंबरच्या शेवटी हा अंक असणं म्हणजे घोटाळा? फायद्या-तोट्याचं गणित कसं पाहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Numerology: मोबाइल अंकशास्त्रामध्ये मोबाइल नंबरच्या सर्व अंकांचे महत्त्व असतेच पण त्यापैकी शेवटचे 4 अंक विशेष मानले जातात. यातही शेवटच्या अंकाचे महत्त्व सर्वाधिक मानले जाते. अंकशास्त्रानुसार आज आपण एका खास नंबरविषयी जाणून घेणार आहोत. कोणासाठी हा नंबर कसा फायद्या-तोट्याचा ठरतोय ते जाणून घेऊ.
advertisement
तुमच्या मोबाइल नंबरचा शेवटचा अंक 1 असेल तर आपल्याला जास्त पुरुषांचे कॉल्स येतात. हे लोक तुमच्याशी कमी बोलतात आणि तुम्हीही त्यांच्याशी फक्त कामापुरतीच चर्चा करता. या नंबरमुळे मर्यादित संभाषण होतं. या लोकांना इतर लोकांच्या तुलनेत कॉल्स खूप कमी येतात. सूर्य हा पुरुष तत्त्वाचा प्रतिनिधी मानला जातो, यामुळेच असा अंदाज लावला जातो की ज्यांच्या मोबाइल नंबरचा शेवटचा अंक 1 असतो, त्यांना पुरुष जास्त कॉल करतात.
advertisement
व्यवसाय आणि करिअरवर परिणाम - तुमचा व्यवसाय महिला-प्रधान (महिलांशी संबंधित) असेल आणि तुमच्या मोबाइल नंबरचा शेवटचा अंक 1 असेल, तर तुमच्या व्यवसायात समस्या येऊ शकतात. तुमच्याकडे योग्य ग्राहकांचे कॉल्स येणार नाहीत. जर तुमच्या व्यवसायाच्या मोबाइल नंबरचा शेवटचा अंक 1 असेल, तर कॉल्सच कमी आल्यामुळे तुम्ही व्यवसाय काय करणार? त्यामुळे टेली मार्केटिंग किंवा ऑनलाइन मार्केटिंगसाठी मोबाइल नंबरचा शेवटचा अंक १ असलेला नंबर वापरू नये.
advertisement
advertisement
सरकारी क्षेत्राकडून लाभ: मोबाइल नंबरच्या शेवटी 1 असलेल्या लोकांना सरकार किंवा सरकारी क्षेत्र (शासन-सत्ता) यांपासून लाभ होण्याची शक्यता असते. मात्र, या लोकांमध्ये अहंकार अधिक असू शकतो, ज्यामुळे त्यांना नुकसानही होते. सूर्य राजा असल्याने अशा लोकांमध्ये इतरांपेक्षा वेगळे दिसण्याचा आणि राहण्याचा थोडा इगो असतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)