Astrology: आलेली संकटं आपोआप मार्गातून दूर! गुरु-शुक्राच्या लाभदृष्टीचा या राशींना होणार फायदा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Astrology Marathi: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे वेळोवेळी संक्रमण होतं आणि ते इतर ग्रहांशी युती करतात, त्याचा परिणाम मानवी जीवनावर म्हणजेच संपूर्ण राशीचक्रावर दिसून येतात. आज 8 ऑक्टोबर, बुधवार रोजी ज्योतिषशास्त्रातील दोन सर्वात शुभ ग्रह एकमेकांपासून 60° च्या कोनात असतील. यामुळे लाभ दृष्टी योग निर्माण होईल, तो काही राशींचे भाग्य उजळवू शकतो. शिवाय, उत्पन्नात आणि करिअरमध्ये चांगली वाढ होण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत..
advertisement
advertisement
advertisement
कर्क राशीच्या सरकारी नोकरी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यवसाय संधी निर्माण होतील आणि कोणत्याही रखडलेल्या प्रकल्पांना गती मिळू शकते. यावेळी नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. तुम्ही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये देखील सहभागी होऊ शकता.
advertisement
advertisement
व्यवसायात असलेल्या वृषभ राशीच्या लोकांना नवीन करार किंवा भागीदारीचा प्रस्ताव मिळू शकतो, तो भविष्यात फायदेशीर ठरेल. तुमचा बँक बॅलन्स वाढेल, तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायात प्रगती मिळेल. अविवाहित व्यक्तींनाही चांगला जोडीदार मिळू शकतो.(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)