Rashi Bhavishya In Marathi: मिथुन, सिंहसहित या राशींना विशेष लाभाचे योग, आजचं राशिभविष्य 22 मार्च 2024

Last Updated:
Rashi Bhavishya In Marathi: कसा असेल आजचा दिवस, कोणाला कशातून होईल लाभ? कोणाला कोणत्या समस्या देतील त्रास, कोणत्या गोष्टींची घ्यावी लागेल काळजी. पहा आजचं दैनिक राशीभविष्य (22 मार्च 2024)..
1/12
मेष (Aries) : दिवस मध्यम फलदायी असेल. नोकरदार व्यक्ती ऑफिसमध्ये अपूर्ण कामं पूर्ण करण्यात व्यस्त राहतील. त्यामुळे आज ते इतर कामांकडे फारसं लक्ष देणार नाहीत. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी वाद घालणं टाळा अन्यथा ते तुम्हाला विनाकारण अडचणीत आणतील. संध्याकाळी मित्रांबरोबर पार्टीचं आयोजन कराल. पण पार्टीत मादक पदार्थ सेवन करू नका. प्रवास लाभदायक ठरेल. एखाद्या मित्रासाठी पैशाची व्यवस्था करावी लागेल.Lucky Color : Olive
Lucky Number : 12
मेष (Aries) : दिवस मध्यम फलदायी असेल. नोकरदार व्यक्ती ऑफिसमध्ये अपूर्ण कामं पूर्ण करण्यात व्यस्त राहतील. त्यामुळे आज ते इतर कामांकडे फारसं लक्ष देणार नाहीत. ऑफिसमधील सहकाऱ्यांशी वाद घालणं टाळा अन्यथा ते तुम्हाला विनाकारण अडचणीत आणतील. संध्याकाळी मित्रांबरोबर पार्टीचं आयोजन कराल. पण पार्टीत मादक पदार्थ सेवन करू नका. प्रवास लाभदायक ठरेल. एखाद्या मित्रासाठी पैशाची व्यवस्था करावी लागेल.Lucky Color : Olive Lucky Number : 12
advertisement
2/12
वृषभ (Taurus) : समाजात प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. पण आज तुमचा कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद होऊ शकतो. यासाठी तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. लव्ह लाईफमध्ये जोडीदाराचं म्हणणं ऐकून आणि समजून घ्या. मुलांकडून एखादी माहिती समजल्याने तुम्हाला त्याबाबत चिंता वाटेल. संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.Lucky Color : Navy Blue
Lucky Number : 5
वृषभ (Taurus) : समाजात प्रतिष्ठा वाढेल. विद्यार्थ्यांना शिक्षणात यश मिळेल. पण आज तुमचा कुटुंबातील एखाद्या सदस्याशी वाद होऊ शकतो. यासाठी तुम्हाला कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्यावा लागेल. लव्ह लाईफमध्ये जोडीदाराचं म्हणणं ऐकून आणि समजून घ्या. मुलांकडून एखादी माहिती समजल्याने तुम्हाला त्याबाबत चिंता वाटेल. संध्याकाळी धार्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.Lucky Color : Navy Blue Lucky Number : 5
advertisement
3/12
मिथुन (Gemini) : दिवस सकारात्मक आहे. आईसोबतच्या नात्यात निर्माण झालेली कटूता दूर होईल. मनात नकारात्मक विचार येणार नाहीत, याकडे लक्ष द्या अन्यथा तुम्ही चुकीच्या मार्गाला जाल. त्यामुळे सावध रहा. खूप दिवसांपासून सुरू असलेला संपत्तीसंदर्भात वाद संपेल आणि त्याबाबतचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी समजेल.Lucky Color : Red
Lucky Number : 17
मिथुन (Gemini) : दिवस सकारात्मक आहे. आईसोबतच्या नात्यात निर्माण झालेली कटूता दूर होईल. मनात नकारात्मक विचार येणार नाहीत, याकडे लक्ष द्या अन्यथा तुम्ही चुकीच्या मार्गाला जाल. त्यामुळे सावध रहा. खूप दिवसांपासून सुरू असलेला संपत्तीसंदर्भात वाद संपेल आणि त्याबाबतचा निर्णय तुमच्या बाजूने लागेल. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी समजेल.Lucky Color : Red Lucky Number : 17
advertisement
4/12
कर्क (Cancer) :  कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकते, त्यामुळे घरात उत्साही वातावरण असेल. संध्याकाळी कुटुंबासह सहलीला जाऊ शकता. एखाद्या नातेवाईकासोबत भागीदारीत व्यवसाय करण्याची योजना आखण्याचा विचार असेल, तर हा विचार सोडून द्या अन्यथा नात्यात दुरावा येईल. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे लोक तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. गोड बोलण्याने तुम्ही लोकांची मनं जिंकाल.Lucky Color : Yellow
Lucky Number : 9
कर्क (Cancer) :  कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवाल. कुटुंबातील एखाद्या सदस्याला सरकारी नोकरी मिळू शकते, त्यामुळे घरात उत्साही वातावरण असेल. संध्याकाळी कुटुंबासह सहलीला जाऊ शकता. एखाद्या नातेवाईकासोबत भागीदारीत व्यवसाय करण्याची योजना आखण्याचा विचार असेल, तर हा विचार सोडून द्या अन्यथा नात्यात दुरावा येईल. तुमच्या चांगल्या स्वभावामुळे लोक तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. गोड बोलण्याने तुम्ही लोकांची मनं जिंकाल.Lucky Color : Yellow Lucky Number : 9
advertisement
5/12
सिंह (Leo) : आज नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल. त्यामुळे रखडलेली कामं पूर्ण करण्याकडे तुमचा कल असेल. पण तुम्हाला आजच्या कामाकडं देखील लक्ष द्यावं लागेल नाहीतर ही कामं ठप्प होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्याने समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. ज्या व्यक्ती घरापासून दूर राहून काम करतात, त्यांना कुटुंबाची आठवण सतावेल. कुटुंबातील सदस्याच्या विवाहासंदर्भातील अडचण दूर होईल.Lucky Color : Green
Lucky Number : 16
सिंह (Leo) : आज नवीन ऊर्जा अनुभवायला मिळेल. त्यामुळे रखडलेली कामं पूर्ण करण्याकडे तुमचा कल असेल. पण तुम्हाला आजच्या कामाकडं देखील लक्ष द्यावं लागेल नाहीतर ही कामं ठप्प होऊ शकतात. कुटुंबातील एखाद्या सदस्याची तब्येत बिघडल्याने समस्यांना सामोरे जावं लागू शकतं. ज्या व्यक्ती घरापासून दूर राहून काम करतात, त्यांना कुटुंबाची आठवण सतावेल. कुटुंबातील सदस्याच्या विवाहासंदर्भातील अडचण दूर होईल.Lucky Color : Green Lucky Number : 16
advertisement
6/12
कन्या (Virgo) : आज तुम्हाला नवीन मालमत्ता घेण्याची इच्छा होईल. तुमची बौद्धिक क्षमता सुधारेल. शेअर बाजार,लॉटरीत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. त्यामुळे तुम्ही सहजपणे गुंतवणूक करू शकता. विद्यार्थ्यांनी कच्च्या विषयाकडे लक्ष देत परिश्रम घेतले तर त्यांना यश मिळेल. कुटुंबातील सदस्याचा विवाह ठरल्याने घरात शुभकार्याबाबत चर्चा होईल. तुम्हाला तुमचे वडील एखादं व्यावसायिक काम सोपवतील. हे काम जर तुम्ही वेळेत पूर्ण केलं नाही तर ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.Lucky Color : Brown
Lucky Number : 11
कन्या (Virgo) : आज तुम्हाला नवीन मालमत्ता घेण्याची इच्छा होईल. तुमची बौद्धिक क्षमता सुधारेल. शेअर बाजार,लॉटरीत पैसे गुंतवणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. त्यामुळे तुम्ही सहजपणे गुंतवणूक करू शकता. विद्यार्थ्यांनी कच्च्या विषयाकडे लक्ष देत परिश्रम घेतले तर त्यांना यश मिळेल. कुटुंबातील सदस्याचा विवाह ठरल्याने घरात शुभकार्याबाबत चर्चा होईल. तुम्हाला तुमचे वडील एखादं व्यावसायिक काम सोपवतील. हे काम जर तुम्ही वेळेत पूर्ण केलं नाही तर ते तुमच्यावर नाराज होऊ शकतात.Lucky Color : Brown Lucky Number : 11
advertisement
7/12
तूळ (Libra) :  सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज कोणत्याही वादात पडणं टाळावं अन्यथा तुमची प्रतिमा डागाळू शकते. आध्यात्मिक क्षेत्रात रुची वाढेल. ज्या व्यक्ती मंदावलेल्या व्यवसायासाठी कुटुंबातील सदस्य किंवा बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना सहज कर्ज मिळेल. कोणताही निर्णय शहाणपणानं आणि विचारपूर्वक घ्या. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला तर नंतर पश्चाताप करावा लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी समजेल.Lucky Color : Pink
Lucky Number : 7
तूळ (Libra) :  सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आज कोणत्याही वादात पडणं टाळावं अन्यथा तुमची प्रतिमा डागाळू शकते. आध्यात्मिक क्षेत्रात रुची वाढेल. ज्या व्यक्ती मंदावलेल्या व्यवसायासाठी कुटुंबातील सदस्य किंवा बँकेकडून कर्ज घेण्याचा विचार करत आहेत, त्यांना सहज कर्ज मिळेल. कोणताही निर्णय शहाणपणानं आणि विचारपूर्वक घ्या. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या सल्ल्यानुसार निर्णय घेतला तर नंतर पश्चाताप करावा लागेल. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना एखादी चांगली बातमी समजेल.Lucky Color : Pink Lucky Number : 7
advertisement
8/12
वृश्चिक (Scorpio) : दिवस सामान्य असेल. आज तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. पण त्यावेळी उत्पन्न लक्षात घेत खर्च करणं योग्य ठरेल. मुलाची करिअरमधली प्रगती पाहून आनंद वाटेल. जर एखाद्या व्यक्तीनं सौदा समजून सांगत त्यासाठी आग्रह केला तरी तुम्ही तो टाळावा. कारण असा सौदा तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आज सभा, मेळावा घेण्याची संधी मिळेल.Lucky Color : Blue
Lucky Number : 5
वृश्चिक (Scorpio) : दिवस सामान्य असेल. आज तुम्ही जोडीदारासोबत बाहेर फिरायला जाल. पण त्यावेळी उत्पन्न लक्षात घेत खर्च करणं योग्य ठरेल. मुलाची करिअरमधली प्रगती पाहून आनंद वाटेल. जर एखाद्या व्यक्तीनं सौदा समजून सांगत त्यासाठी आग्रह केला तरी तुम्ही तो टाळावा. कारण असा सौदा तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतो. राजकीय क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना आज सभा, मेळावा घेण्याची संधी मिळेल.Lucky Color : Blue Lucky Number : 5
advertisement
9/12
धनू (Sagittarius) :  करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. कुटुंबातील एखादा सदस्य आज तुमचं मन दुखावेल. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या काही निर्णयांवर तो टीका करेल. तुम्ही तुमच्या समस्या पालकांशी शेअर कराल. ते तुम्हाला त्यावर उपाय सांगतील. मित्राकडून वेळेवर मदत मिळाल्याने तुमची प्रलंबित कामं मार्गी लागतील. यामुळे तुम्हाला आनंद वाटेल.Lucky Color : Orange
Lucky Number : 13
धनू (Sagittarius) :  करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होण्यासाठी एखाद्या अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल. कुटुंबातील एखादा सदस्य आज तुमचं मन दुखावेल. तुम्ही भूतकाळात घेतलेल्या काही निर्णयांवर तो टीका करेल. तुम्ही तुमच्या समस्या पालकांशी शेअर कराल. ते तुम्हाला त्यावर उपाय सांगतील. मित्राकडून वेळेवर मदत मिळाल्याने तुमची प्रलंबित कामं मार्गी लागतील. यामुळे तुम्हाला आनंद वाटेल.Lucky Color : Orange Lucky Number : 13
advertisement
10/12
मकर (Capricorn) : दिवस चिंता वाढवणारा असेल. पण त्याचा तुमच्या मनावर किंवा कामावर परिणाम होऊ देऊ नका. कारण तुमचे शत्रू या स्थितीचा गैरफायदा घेऊ शकतात. नोकरदार व्यक्तींना आज एखादं काम सोपवलं जाऊ शकतं. हे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीची गरज भासेल. त्यामुळे सहकाऱ्यांकडून गोड बोलून काम करून घ्या. काम वेळेवर पूर्ण करा. आज तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी व्हाल. तुमच्या आईला डोळ्यांशी संबंधित काही समस्या असेल तर आज तो त्रास वाढण्याची शक्यता आहे.Lucky Color : White
Lucky Number : 2
मकर (Capricorn) : दिवस चिंता वाढवणारा असेल. पण त्याचा तुमच्या मनावर किंवा कामावर परिणाम होऊ देऊ नका. कारण तुमचे शत्रू या स्थितीचा गैरफायदा घेऊ शकतात. नोकरदार व्यक्तींना आज एखादं काम सोपवलं जाऊ शकतं. हे काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांच्या मदतीची गरज भासेल. त्यामुळे सहकाऱ्यांकडून गोड बोलून काम करून घ्या. काम वेळेवर पूर्ण करा. आज तुम्ही धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी व्हाल. तुमच्या आईला डोळ्यांशी संबंधित काही समस्या असेल तर आज तो त्रास वाढण्याची शक्यता आहे.Lucky Color : White Lucky Number : 2
advertisement
11/12
कुंभ (Aquarius) :  आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची चिंता वाढेल. आजाराची काही लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या अन्यथा आजार बळावू शकतो. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना एखादी चांगली संधी मिळेल. संध्याकाळी एखाद्या शुभकार्यात सहभागी व्हाल. मात्र या कार्यक्रमात तुम्ही तुमचे विचार शेअर करणं टाळा अन्यथा इतर व्यक्ती त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.Lucky Color : Silver
Lucky Number : 18
कुंभ (Aquarius) :  आज आरोग्याची विशेष काळजी घ्या. जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची चिंता वाढेल. आजाराची काही लक्षणं दिसली तर लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या अन्यथा आजार बळावू शकतो. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना एखादी चांगली संधी मिळेल. संध्याकाळी एखाद्या शुभकार्यात सहभागी व्हाल. मात्र या कार्यक्रमात तुम्ही तुमचे विचार शेअर करणं टाळा अन्यथा इतर व्यक्ती त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतील.Lucky Color : Silver Lucky Number : 18
advertisement
12/12
मीन (Pisces) : दिवस खूप फलदायी आहे. तुम्ही गोड बोलण्यातून जोडीदाराचे लक्ष वेधून घ्याल. तुम्हाला जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. भागीदारीत व्यवसाय असलेल्या लोकांना नुकसान सहन करावं लागू शकतं. पण भावांशी सल्लामसलत करून ते नुकसान टाळू शकतात. तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत तीर्थक्षेत्री जाल. मात्र त्या ठिकाणी किंवा प्रवासात मौल्यवान वस्तू जपा अन्यथा या वस्तू चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे प्रवासात पूर्ण सावधगिरी बाळगा.Lucky Color : Gray
Lucky Number : 19
मीन (Pisces) : दिवस खूप फलदायी आहे. तुम्ही गोड बोलण्यातून जोडीदाराचे लक्ष वेधून घ्याल. तुम्हाला जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. भागीदारीत व्यवसाय असलेल्या लोकांना नुकसान सहन करावं लागू शकतं. पण भावांशी सल्लामसलत करून ते नुकसान टाळू शकतात. तुम्ही तुमच्या आई-वडिलांसोबत तीर्थक्षेत्री जाल. मात्र त्या ठिकाणी किंवा प्रवासात मौल्यवान वस्तू जपा अन्यथा या वस्तू चोरीला जाऊ शकतात. त्यामुळे प्रवासात पूर्ण सावधगिरी बाळगा.Lucky Color : Gray Lucky Number : 19
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement