Weekly Horoscope: कसा असेल नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा? पहा तुमचं साप्ताहिक राशीभविष्य
- Published by:Ramesh Patil
- Written by:Rutuparna Mujumdar
Last Updated:
Weekly Horoscope: आज दिनांक 26 नोव्हेंबर 2023 रविवार. आज कार्तिक शुक्ल चतुर्दशी/पौर्णिमा. आज त्रिपुरी पौर्णिमा. या सप्ताहात शनि कुंभ राशीत मार्गी असून गुरू मेष राशीत तर राहू केतू अनुक्रमे मीन व कन्या राशीत असतील. रवि मंगळ, वृश्चिक तर बुध दिनांक 27 नोव्हेंबर रोजी धनु या गुरू राशीत प्रवेश करीत असून शुक्र दिनांक 29 रोजी उत्तररात्री तूळ या उच्च राशीत प्रवेश करीत आहे. दिनांक 27 नोव्हेंबर रोजी चंद्र मिथुन या राशीत असणार आहे. अनेक ग्रह उच्च अवस्थेत असल्यानं हा आठवडा शुभ फळ देईल. या ग्रहस्थितीनुसार पाहूया या आठवड्याचे राशी भविष्य.(लग्नानुसार)
मेष - राशी स्वामी मंगळ अष्टम स्थानात असून आरोग्य व सामाजिक दर्जा सांभाळून रहा. प्रवास करण्यासाठी मदत करेल. घरात काही कार्यक्रम होतील. तुमच्या सामाजिक, व्यावसायिक जीवनात अनेक नवीन संधी चालून येतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. व्ययात येणारा राहू काम सहजी होऊ देणार नाही. एकच विचार कराल. रक्तदाब आदी विकार त्रास देतील. चंद्र भ्रमण नोकरी व्यवसायात लाभ देईल. कुंभेचा शनी लाभदायक आहे. मित्र साथ देतील. कार्य करीत रहा आणि उत्तम फळ प्राप्त करा. अष्टम स्थानात येणार रवि आरोग्य चिंता देईल. शुक्र नवीन ओळखी करील. वैवाहिक जीवन सुखद होईल. या काळात मंगळ उपासना करा. सप्ताह उत्तम.
advertisement
वृषभ - राशी स्वामी शुक्र तूळ या स्वराशीत येत असून घरात आर्थिक व्यय होतील. प्रकृतीवर खर्च कराल. मित्र व बंधूकडून सहयोग मिळेल. मातृ-पितृ सुख मिळेल. मंगळ कार्य क्षेत्रात नवीन संधी देईल. घर आणि व्यवसाय यात धावपळ होणार आहे. तरी प्रकृती जपून असावे. व्यय स्थानातील गुरू महाराज प्रवासाचे योग आणतील. कायदा पाळा. कार्यक्षेत्रात आणि प्रकृती जपून रहा असे संकेत देत आहे. सप्ताह शुभ फळ देईल.
advertisement
मिथुन - राशी स्वामी बुध सप्तम स्थानी असून जोडीदार भेट आणि प्रवास घडवेल. आयुष्य मौजमजा सहल यात आनंदात जाईल. शनिची साथ नवीन संधी आणि परदेश गमन यासाठी उत्तम राहील. राशीचे धन स्थानात येणारा चंद्र आर्थिक भरभराट निर्माण करेल. गुरू महाराज कर्म स्थान आणि सुख स्थानावर शुभ दृष्टी ठेवून आहेत. नवीन वास्तू किंवा वाहन यासाठी प्रयत्न करा. सध्या प्रकृतीच्या तक्रारीकडे लक्ष असू द्या. सर्व दृष्ट्या सप्ताह चांगला जाईल.
advertisement
कर्क - राशी स्वामी चंद्र पूर्वार्धात उच्च असणार आहे. जोडीदाराला उत्तम संधी देणार आहे. मानसिक आणि आर्थिक पाठबळ देईल. नातेवाईक भेट होईल. शनि महाराज अष्टमात मार्गी आहेत. अगदी जपून रहा. प्रवास जपून करा. पैशाचा अपव्यय टाळा. सध्या गुरू बळ उत्तम आहे. त्यामुळे सप्ताह उत्तम पार पडेल. शनीची उपासना सुरू ठेवा. पंचम स्थानात रवि मंगळ आहे. अधिकार प्राप्तीचे योग. सप्ताह मध्यम.
advertisement
सिंह - राशीस्वामी रवि मंगळाच्या राशीत असून उच्च अधिकारी वर्गाकडून लाभ होईल. कायद्याचे पालन करा. वैवाहिक जीवनात धोक्यापासून सावध राहा. काही उष्णतेचे विकार त्रास देतील. गुरूबळ आहे तरीही सावध राहून कार्य करा. लवकरच दिवस बदलणार आहेत. बुध व्यावसायिक स्पर्धा निर्माण करील. मात्र काही संधी मिळतील. काळजीपूर्वक पुढे जा. गृह वाहन याबाबत लाभ संभावतों. चंद्र कार्यक्षेत्रात, वैवाहिक जीवनात फळ देणार आहे. सप्ताह मध्यम.
advertisement
कन्या - राशी स्वामी बुध ग्रह चतुर्थ स्थानात आहे. व्यवसाय नोकरीच्या दृष्टीने उत्तम काळ. तृतीय मंगळ घरात अनेक खर्च करेल. नवीन वस्तूंची खरेदी होईल. दशम स्थानातील चंद्र नोकरीत बदल देईल. व्यवसायात समस्या कमी करेल. ग्रह शत्रूपासून सावध राहा, असा इशारा देत आहेत. काही जुनी दुखणी डोकं वर काढतील. वेळीच उपचार करा. सप्तम राहू संभ्रम निर्माण करेल. जोडीदार निवडताना काळजी घ्या. सप्ताहाचा पूर्वार्ध मध्यम आहे. मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. सप्ताह मध्यम.
advertisement
तूळ - राशी स्वामी शुक्र स्वस्थानात असून सामाजिक आणि संततीसंबंधी उच्च फळ देईल. मंगळ उच्च पदाचे योग आणेल. सप्तम गुरू वैवाहिक जीवनात आनंद निर्माण करेल. राहू जपून राहण्याचे संकेत देत आहे. काहीसे नकारात्मक वातावरण राहील. उत्तरार्धात मात्र बदल होईल. चंद्र मन आणि आरोग्य दोन्ही मध्यम ठेवेल. सरकारी कामकाजात यश देईल. एकूण सप्ताह मिश्र फळ देईल.
advertisement
वृश्चिक - राशी स्वामी मंगळाचे स्वस्थानात भ्रमण व्यावसायिक जीवनात लाभ दाखवत आहे. गैरसमज, कलह टाळा. नवीन संधीचा पुरेपूर वापर करा. कौटुंबिक जीवनात देखील घडामोडी होतील. पूर्वार्धात चंद्र मातृ-पितृ चिंता निर्माण करेल. घरामध्ये मोठ्या घटना घडवून आणेल. भावंडांची काळजी घ्या. मानसिक ताण जाणवेल. शत्रूपासून जपा. सप्ताह मध्यम जाईल.
advertisement
धनू - राशी स्वामी गुरू पंचम स्थानात आहे. संतती सौख्य आणि उच्च शिक्षण यासाठी उत्तम फळ देईल. मातृ सुख देईल. कार्यालयीन कामकाज करण्यात यश देईल. अचानक येणाऱ्या नवीन संधी जाऊ देऊ नका. व्यय स्थानात येणारा मंगळ नोकरीत नवीन संधी गमावेल. स्वभाव तापट करेल. धार्मिक अधिष्ठान प्राप्त होईल. सप्ताहाचा पूर्वार्ध जपून रहा. परदेश प्रवासाचे योग येऊ शकतात. भावंडांशी वागताना काळजी घ्या. वैवाहिक जीवन ठीक राहील. शिव उपासना करा. सप्ताह मध्यम.
advertisement
मकर - राशी स्वामी शनि धन स्थानात मार्गी असून आर्थिक, कौटुंबिकदृष्ट्या काहीसे नकारात्मक परिणाम देईल. चतुर्थ स्थानात गुरू भरभराट घडवेल. गृह वाहन लाभ होईल. भावंडांच्या उत्कर्षासाठी अनुकूल काळ आहे. तसेच परदेश प्रवास घडतील. राहू मातृ सुखात कमी आणेल. स्थान बदल घडेल. कार्य क्षेत्रात जर काही बदल करायचे असतील तर हा अनुकूल काळ आहे. संतती चिंता वाटत असेल तर तिकडे लक्ष असू द्या. वैवाहिक दृष्ट्या सप्ताह कठीण आहे
advertisement
कुंभ - राशी स्वामी शनि स्वगृही असून शुक्र अचानक प्रवास, समारंभात सहभाग, उत्तम खरेदी असे लाभ देईल. वैचारिक प्रगल्भता देईल. साडेसाती असली तरी धन कारक गुरू आर्थिक आणि कौटुंबिक बाबीत लाभ देईल. प्रेरणादायी विचार येतील. बोलण्याने लोकांना जिंकून घ्याल. पैतृक संपत्ती मिळेल. जोडीदाराची नवीन खरेदी, सजावट किंवा नवीन प्रॉपर्टीचे योग येतील. मंगळ जपून राहण्याचे संकेत देत आहे. शत्रू वाढतील. सप्ताह मध्यम जाईल.
advertisement
मीन - राशी स्वामी गुरू धनस्थनात असून मान सन्मान, प्रगती आणि संपत्ती यात वाढ करेल. कुटुंबात वाढ, वैवाहिक जीवनाची सुरवात, तसेच संतती प्राप्तीकरता उत्तम काळ आहे. साडेसाती असली तरी नवीन लाभ देईल. परदेश गमनाची संधी येईल. व्यय शनि आणि राशीतील राहू घरापासून दूर जाण्याचे योग आणेल. गृह सौख्य आणि भावंडाना लाभ संभवतात. सप्ताहाच्या पूर्वार्धात वैवाहिक जीवनात काळजी घ्या. आरोग्य जपा. सप्ताह मध्यम.शुभम भवतू!!