Lord Ganesha Statue: भारतात नव्हे, या देशात आहे गणपतीची सर्वात उंच खडी गणेश मूर्ती; इतिहास-महत्त्व पहा
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Worlds Tallest Standing Lord Ganesha Statue : श्री गणेशाची पूजा फक्त भारतात होत नसून जगातील अनेक देशांमध्ये गणरायाला भक्ती भावानं पूजलं जातं. श्री गणेशाच्या मूर्ती जगातील इतर देशांमध्येही आढळतात. विशेष गोष्ट म्हणजे भारतात नाही इतकी मोठी गणेश मूर्ती जगातील दुसऱ्या एका देशात आहे. जगातील सर्वात उंच उभी असलेली गणेशमूर्ती भारतात नव्हे तर थायलंडमध्ये आहे. ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे.
advertisement
ही मूर्ती नेमकी कुठे आहे? - थायलंडच्या चाचोएंगसाओ प्रांतात असलेली ही भव्य मूर्ती ख्लोंग खुआन गणेश आंतरराष्ट्रीय उद्यानात बांधण्यात आली आहे. या मूर्तीची उंची 39 मीटर असून ही मूर्ती 854 कांस्य तुकड्यांपासून तयार करण्यात आली आहे. ही मूर्ती 40,000 चौरस मीटर क्षेत्रात पसरलेली आहे. या मूर्तीचे बांधकाम सुमारे चार वर्षे चालले होते, ते 2012 मध्ये पूर्ण झाले. ही मूर्ती केवळ वास्तुशिल्पीय चमत्कार नसून थायलंडच्या सांस्कृतिक वारशाचे आणि धार्मिक श्रद्धेचे प्रतीक देखील आहे.
advertisement
भाविक मोठ्या संख्येने येतात - श्री गणेशाची ही विशाल मूर्ती बांग पाकोंग नदीच्या काठावर बांधली गेली आहे. रस्ते आणि जलमार्गाने प्रवास करणारे लोक ती दुरून पाहू शकतात. मूर्तीचा आकार इतका प्रचंड आहे की ती दूरवरून दिसते आणि दररोज मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येथे येतात. हे ठिकाण आज चाचोएंगसाओ परिसरातील एक प्रमुख पर्यटन स्थळ बनले आहे.
advertisement
ही मूर्ती थायलंडचे प्रसिद्ध कलाकार पिटक चालेमलाओ यांनी डिझाइन केली आहे. त्यांनी गणेशाच्या चार हातांमध्ये ऊस, फणस, केळी आणि आंबा ही फळे साकारली आहेत. ही फळे समृद्धी, प्रगती आणि आशीर्वादाचे प्रतीक मानली जातात. गणेशाला एक पाऊल पुढे जाताना दाखवलं आहे, ते थाई राष्ट्राच्या विकास आणि सकारात्मक विचारसरणीचे प्रतिक मानले जाते. पुतळ्याच्या डोक्यावरील कमळाचा मुकुट ज्ञानाचे प्रतीक आहे आणि वरच्या बाजूला असलेले "ओम" चे प्रतीक त्याचे दिव्यत्व दर्शवते.
advertisement
थायलंडचे लोक गणेश भक्त - थायलंडमध्ये गणेश पूजा खूप पूर्वीपासून केली जाते. ब्राह्मण संस्कृतीचा प्रभाव सुमारे एक हजार वर्षांपूर्वी येथे पसरला आणि तेव्हापासून श्री गणेश देखील थाई समाजाच्या आस्थेचा एक भाग बनला. कालांतराने, त्याची प्रतिमा थायलंडच्या प्रत्येक क्षेत्रात - मग ती शिक्षण, व्यवसाय, कला किंवा जीवनाचे इतर कोणतेही पैलू असो - आपले स्थान निर्माण करत गेली. येथील लोकांचा असा विश्वास आहे की गणेशाच्या आशीर्वादाने सर्व अडचणी दूर होतात, यश मिळते.
advertisement
बाप्पाची घरोघरी पूजा - गणेशाची पूजा केवळ मंदिरांपुरती मर्यादित नाही. थायलंडमधील अनेक घरे, विद्यापीठे आणि दुकानांमध्येही गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावले जातात. दरवर्षी विशेष उत्सव आणि कार्यक्रमांद्वारे गणेशाचा सन्मान केला जातो. अशाप्रकारे, भारताबरोबरच श्रीगणेश आज थायलंडच्या संस्कृतीचा पूर्णपणे भाग बनला आहे.


