Car Care : उन्हात गाडी चालवताय? तर 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर कारमध्ये होईल स्फोट!
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
उन्हाळ्यात कार सुरक्षित ठेवण्यासाठी काही साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. कार उन्हात पार्क केल्याने ओव्हरहिटिंग होऊन ब्लास्ट होण्याचा धोका असतो. ब्रेक व इंजिन ऑइल...
उन्हाळ्यात चारचाकी चालवत असताना काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे, अन्यथा मोठं नुकसान होण्याची शक्यता असते. तर पहिला नियम म्हणजे गाडीला उन्हापासून वाचवायचं. आपण गाडी चालवून आलो की, तिला सावलीत पार्क करायची. जर गाडी उन्हात उभी केली तर ती खूप तापते. जास्त तापल्यामुळे काही वेळा स्फोट होण्याची शक्यता असते आणि इतर नुकसानही होऊ शकतं.
advertisement
advertisement
तिसरी गोष्ट आहे गाडीच्या टायरची काळजी घेणं. टायरमध्ये गरजेपेक्षा जास्त हवा भरायची नाही. जर तुम्ही गाडी चालवत असाल तर पुढच्या टायरमध्ये 30 ते 32 टक्के आणि मागच्या टायरमध्ये 40 टक्क्यांपेक्षा जास्त हवा ठेवू नका. त्याचबरोबर जर टायरच्या ट्यूबला पंक्चर झाला असेल तर ती ट्यूब गाडी चालवताना वापरू नका, नाहीतर टायर फुटू शकतो.
advertisement
आता बघूया गाडी पार्क करताना काय करायचं. जेव्हा तुम्ही गाडी पार्क करता तेव्हा तिच्या काचा थोड्या उघड्या ठेवा. सगळ्या काचा पूर्णपणे बंद ठेवल्या तर गाडीच्या आत हवा कोंडली जाते आणि सीट गरम होतात. जास्त उन्हात गाडी पार्क केल्यानंतर हवा कोंडली तर आग लागण्याची पण शक्यता असते. म्हणून गाडीच्या काचा थोड्या उघड्या ठेवा म्हणजे हवा खेळती राहील.
advertisement
advertisement
advertisement