Scooter: लेकीला स्कुटर घेऊन देण्याची हीच वेळ! 15000 ने झाली स्वस्त अन् रेंजही 143 किमी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
जर तुम्ही ईव्ही स्कुटर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर थोडं थांबा. कारण, लवकरच भारतात आणखी स्वस्त आणि मस्त स्कुटर लाँच होणार आहे.
जर तुम्ही ईव्ही स्कुटर खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर थोडं थांबा. कारण, लवकरच भारतात आणखी स्वस्त आणि मस्त स्कुटर लाँच होणार आहे. हिरो मोटोकॉर्पने अलीकडे आपली Vida V2 स्कुटर सीरिजच्या किंमती मोठी कपात केली आहे. त्यामुळे ही स्कुटर तुम्हाला सहज खरेदी करता येईल. एवढंच नाहीतर हिरो मोटर्सने उत्तम अशा ऑफर्सही दिल्या आहेत .
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
लवकरच आता हीरो मोटोकॉर्प Vida Z हे नवीन मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. अलीकडेच या स्कुटरची चाचणी सुरू असताना रस्त्यावर दिसली. कंपनीने EV सेगमेंट मध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक मोठे बदल केले असून लवकरच आणखी मॉडेल लाँच करणार आहे. Vida सीरीजचा सामना हे थेट एथर 450, ओला S1, टीवीएस iQube आणि बजाज चेतकसोबत आहे.