Kia ची SUV निघाली टँकसारखी कडक, मिळाले 5 स्टार सेफ्टी रेटिंग!
- Published by:sachin Salve
Last Updated:
या एसयुव्हीच्या डिझाइनवरून काही जणांनी तिची तुलना गरिबांची डिफेन्डर म्हणून केली. पण आता या Kia Syros ने सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळवून टिकाकारांचे तोंड बंद केले आहे.
हुंदईच्या नंतर भारतीय मार्केटमध्ये Kia मोटर्सने आता आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. अलीकडे किआ मोटर्सने Kia Syros ही एसयुव्ही लाँच केली होती. या एसयुव्हीच्या डिझाइनवरून काही जणांनी तिची तुलना गरिबांची डिफेन्डर म्हणून केली. पण आता या Kia Syros ने सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळवून टिकाकारांचे तोंड बंद केले आहे.
advertisement
किआ मोटर्सने अलीकडेच Kia Syros लाँच केली होती. दमदार फिचर्स आणि हटके डिझाइनमुळे या एसयुव्हीची चांगलीच चर्चा झाली. आता या एसयुव्हीने सेफ्टीमध्ये ५ स्टार रेटिंग मिळवले आहे. ऑफरिंग किआ सिरोसने भारत न्यू कार असेसमेंट प्रोग्राम (बीएनसीएपी) मध्ये अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (एओपी) आणि चाइल्ड ऑक्यूपेंट प्रोटेक्शन (सीओपी) मध्ये 5-स्टार रेटिंग मिळाले आहे. किआसाठी ही मोठी गोष्ट आहे.
advertisement
advertisement
advertisement
तसंच, कियाने किया कनेक्ट डायग्नोसिस (केसीडी) सादर केले आहे, जे वापरकर्त्यांना दूरूनच त्यांच्या वेईकलच्या स्थितीचे मूल्यांकन करण्याची सुविधा देते आणि किया अडवान्स्ड टोटल केअर (केएटीसी) सक्रियपणे ग्राहकांना टायर रिप्लेसमेंट्स व मेन्टेनन्स अशा आवश्यक सर्विसेसबाबत माहिती देते, ज्यामधून विनासायास मालकीहक्काची खात्री मिळते.
advertisement
इंजिन व व्हेरिएण्ट्स: किया सिरॉस दोन इंजिन पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टस्ट्रीम १.०-लिटर टूर्बो पेट्रोल इंजिन (८८.३ केडब्ल्यू/१२० पीएस, १७२ एनएम) आणि १.५-लिटर सीआरडीआय डिझेल इंजिन (८५ केडब्ल्यू/११६ पीएस, २५० एनएम). दोन्ही इंजिन्स मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पर्यायांसोबत कियाचे ६ एमटी कन्फिग्युरेशन असलेल्या पहिल्याच स्मार्टस्ट्रीम जी१.० टर्बो जीडीआयसह ऑफर करण्यात आले आहेत.
advertisement
advertisement