Ola चा मार्केट होणार जाम, Suzuki ने अखेर डाव टाकला, आणली महिलांसाठी बेस्ट E-Scooter
- Published by:sachin Salve
Last Updated:
सुझुकीने इलेक्ट्रिक बाइक सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. सुझुकीची पहिली ईलेक्ट्रिक स्कुटर तयार झाली आहे. लवकरच ही मार्केटमध्ये लाँच करून ओला आणि टीव्हीएसला टक्कर देणार आहे.
जपानची कार आणि मोटारसायकल उत्पादक कंपनी सुझुकीने आता भारतात आपला जम चांगलाच बसवला आहे. दुचाकी सेगमेंटमध्ये सुझुकीने एकापेक्षा एका अशा बाइक आणि स्कुटर लाँच केल्या आहेत,. आता सुझुकी मोटरसायकल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एसएमआयपीएल) इलेक्ट्रिक बाइक सेगमेंटमध्ये एंट्री केली आहे. सुझुकीची पहिली ईलेक्ट्रिक स्कुटर तयार झाली आहे. लवकरच ही मार्केटमध्ये लाँच करून ओला आणि टीव्हीएसला टक्कर देणार आहे.
advertisement
सुझकी मोटर्सने ई-स्कूटर पहिल्यांदा भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो २०२५ मध्ये झलक दाखवली होती. त्यानंतर आता हरियाणामधील गुरग्राममधील प्लँटमध्ये उत्पादन धडाक्यात सुरू केलं आहे. जून महिन्यात ही पहिली वहिली ईलेक्ट्रिक स्कुटर लाँच होण्याची शक्यता आहे. Suzuki e-ACCESS असं नाव देण्यात आलं आहे. शहरातील प्रवाशांना लक्षात घेऊन या स्कुटरचं डिझाइन करण्यात आलं आहे. दैनंदिन वापरासाठी ही स्कुटर बेस्ट असा पर्याय ठरणार आहे.
advertisement
advertisement
Suzuki e-ACCESS मध्ये ब्रेकिंग देखभाल-मुक्त बेल्ट ड्राइव्ह सिस्टम दिलं आहे. सुझुकी ड्राइव्ह मोड सिलेक्टर-ई (SDMS-e) तीन रायडिंग मोडसह - इको, राइड मोड ए आणि राइड मोड बी रिव्हर्स मोड दिलं आहे. बॅटरीची चाचणी ही उष्ण तापमान, पाण्यात बुडणे आणि कंपन यासारख्या कठीण परिस्थितीत केली आहे. ज्यामुळे Suzuki e-ACCESS किती सुरक्षित आहे, हे कंपनीने पटवून दिलं आहे.
advertisement
तसंच, सुझुकीने कमी वेळेच चार्ज होणारी बॅटरी तयार केली आहे. या स्कुटरमध्ये 3.07 kWh ची बॅटरी पॅक, एक इलेक्ट्रिक मोटर दिली आहे, ती 5.5 bhp आणि 15 Nm इतका पीक टॉर्क जनरेट करतो. ही बॅटरी पूर्ण चार्ज केल्यावर 95 किमी इतकी रेंज देतेय. पोर्टेबल चार्जरवर 0 ते 100 टक्के चार्ज होण्यासाठी 6 तास 42 मिनिट लागणार आहे. तर फास्ट चार्जरवर 2 तास 12 मिनिटात बॅटरी चार्ज होईल.
advertisement
advertisement
Suzuki e-ACCESS ची पूर्ण डिजिटल टीएफटी स्क्रीन दिली आहे. ज्यामध्ये स्पीड, ट्रिप मीटर, राइड मोड, वॉच आणि बॅटरी लेव्हलची माहिती देणारे फिचर्स आहे. यामध्ये यूएसबी चार्जिंग पोर्ट दिलं आहे. या स्कुटरची किंमत अद्याप कंपनीकडून जाहीर करण्यात आली नाही. पण या स्कुटरची किंमतही १ लाखाच्या आत असण्याची शक्यता आहे. या स्कुटरचा थेट सामना हा ओला एस१ स्कुटरशी होणार आहे.