Scooters: बायको आणि लेकीसाठी सगळ्यात बेस्ट अशी स्कुटर, रेंज 212 किमी, फिचर्स एक नंबर!
- Published by:sachin Salve
Last Updated:
TVS मोटर्सने मागील काही दिवसांपासून मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. iQube ईलेक्ट्रिक स्कुटरने विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे.
TVS मोटर्सने मागील काही दिवसांपासून मार्केटमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. iQube ईलेक्ट्रिक स्कुटरने विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. देशात सर्वात जास्त विक्रीचा मान iQube ने पटकावला आहे. आता टीव्हीएस मोटर्सने iQube चं आणखी एक सुधारित मॉडेल लाँच केलं आहे. iQube 2025 च्या S आणि iQube ST मॉडेल लाँच केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
TVS सध्या अनेक ईलेक्ट्रिक उत्पादनावर काम करत आहे. TVS आता एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक स्कुटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही स्कुटर दिवाळीच्या दरम्यान लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन TVS इलेक्ट्रिक स्कूटर ही iQube ला खाली असणार आहे. नवीन बजेट-फ्रेंडली इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 90,000 रुपयांपेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. असा अंदाज आहे की, या स्कुटरमध्ये 2.2 kWh ची बॅटरी असणार आहे. त्यामुळे एकदा चार्ज केल्यावर जवळपास 70-80Km इतकी रेंज मिळेल.