बुलेटपेक्षाही 'ही' कार महाराष्ट्रात मिळेल स्वस्त, मुंबईतून पुण्याला जा फक्त 0.50 किमी खर्चाने!
- Published by:sachin Salve
Last Updated:
महाराष्ट्रात महायुती सरकारच्या ईलेक्ट्रिक वाहन धोरणामुळे सोलर आणि ईलेक्ट्रिकवर चालणारी एक कार तुम्हाला एखाद्या रॉयल एनफिल्डच्या बाइकपेक्षाही स्वस्त मिळेल.
वाढते इंधनाचे दर आणि प्रदुषणामुळे सर्वत्र आता ईव्ही कार घेण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. हेच लक्षात घेऊन महायुती सरकारने राज्यामध्ये ईलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. महायुती सरकारच्या या धोरणामुळे राज्यात ईलेक्ट्रिक कारच्या किंमतीत १५ टक्क्यांनी कपात झाली आहे. एवढंच नाहीतर टोल सुद्धा माफ असणार आहे. अलीकडेच सोलर आणि ईलेक्ट्रिकवर चालणारी एक कार मार्केटमध्ये लाँच झाली. ही कार तुम्हाला आता महाराष्ट्रात एखाद्या रॉयल एनफिल्डच्या बाइकपेक्षाही स्वस्त मिळेल.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ही इलेक्ट्रिक कार पूर्ण चार्ज केल्यावर २५० किमी इतका रेंज देऊ शकते. तर सोलर एनर्जीसह चालवली तर एका वर्षामध्ये ही कार 3000 किमी चालवू शकतात. Vayve Mobility ने दावा केला आहे की, सोलर पावर्ड इलेक्ट्रिक कार फक्त 0.50 पैसे प्रति किलोमीटर इतका खर्चावर ही कार धावेल. फक्त 0.50 पैसे एका किलोमिटर चालवण्याचा खर्च येईल. त्यामुळे ही भारतातील सर्वात स्वस्त अशी कार ठरली आहे.