Tata Punch चा पडेल तुम्हाला विसर, येतेय तिच्यापेक्षा छोटीशी Car, किंमतही कमी!
- Published by:sachin Salve
Last Updated:
कंपनीने या वर्षी ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर केली होती. भारतात ही कार लाँच झाल्यावर थेट एमजी कॉमेट ईव्हीशी स्पर्धा करेल.
भारतात सध्या ई कारचा चांगलाच दबदबा वाढला आहे. भारतीय कंपन्यांसह परदेशी कंपन्या भारतात स्वस्तात मस्त ईव्ही कार लाँच करत आहे. अलीकडे व्हिएतनामी इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपनी विनफास्ट लवकरच भारतात त्यांची पहिली छोटी इलेक्ट्रिक हॅचबॅक व्हीएफ३ लाँच करण्याची तयारी करत आहे. कंपनीने या वर्षी ऑटो एक्स्पोमध्ये ही कार सादर केली होती. भारतात ही कार लाँच झाल्यावर थेट एमजी कॉमेट ईव्हीशी स्पर्धा करेल.
advertisement
नवीन VinFast VF3 EV या इलेक्ट्रिक कारमध्ये १८.६४ kWh बॅटरी पॅक असेल जी एका चार्जवर २१५ किमी पर्यंतची रेंज देऊ शकते. ते ५.३ सेकंदात ० ते ५० किमी/ताशी वेग वाढवू शकते. ही ४-सीटर इलेक्ट्रिक कार दोन-दरवाज्यांची इलेक्ट्रिक हॅचबॅक आहे, जी शहरातील ड्रायव्हिंग लक्षात घेऊन डिझाइन करण्यात आली आहे. VF3 इलेक्ट्रिक कारच्या पुढील भागात V-आकाराचे ग्रिल आणि क्रोम फिनिश डिझाइन आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement