Golf GTI: अशी कार तिच्यासमोर SUV सुद्धा काहीच नाही! रेसिंगचा नवा किंग, किंमत अखेर जाहीर
- Published by:sachin Salve
Last Updated:
आता यामध्ये जर्मन कंपनीने आणखी एक भर घातली आहे. सेडान कार सेगमेंटमध्ये जर्मन कंपनी फॉक्सवॅगनने गोल्फ GTI (Volkswagen Golf GTI) लाँच केली आहे. ही कार नसून एक रेसिंग कार आहे
भारतात सध्या एकापेक्षा एक अशा कार आणि एसयुव्हीने मार्केट व्यापलं आहे. एसयूव्हीमध्ये अनेक पर्याय आहे तर दुसरीकडे सेडान कारमध्येही कमी बजेटपासून ते दमदार फिचर्ससह महागड्या गाड्यांचे पर्यायही उपलब्ध आहे. पण आता यामध्ये जर्मन कंपनीने आणखी एक भर घातली आहे. सेडान कार सेगमेंटमध्ये जर्मन कंपनी फॉक्सवॅगनने गोल्फ GTI (Volkswagen Golf GTI) लाँच केली आहे. ही कार नसून एक रेसिंग कार आहे, असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. कारण, या कारचा टॉप स्पीड हा 250 किमी प्रतितास पेक्षा जास्त आहे.
advertisement
Volkswagen ने मागील आठवड्यामध्ये भारतात Golf GTI ची घोषणा केली. ही कार एक रेसिंग कारसारखीच आहे. त्यामुळे लाँच केल्यानंतर ५ दिवसांमध्ये 150 गाड्या बुकिंग झाली. लोकांनी अक्षरश: या कारच्या बुकिंगसाठी रांगा लावल्यात. त्यामुळे ग्राहकांच्या आग्रहाखातर आणखी 100 गाड्यांचं उत्पादन केलं जाणार असून त्या भारतातच डिलिव्हर केल्या जाणार आहे. या गाड्यांची डिलिव्हरी 2026 मध्ये होणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
Volkswagen Golf GTI ने भारतीय मार्केटमध्ये एकच वादळ आणलं. कंपनीने सुरुवातील या कारची किंमत गुलदस्त्यात ठेवली होती. अखेरीस कंपनीने ठरल्याप्रमाणे आज २६ मे रोजी अधिकृत घोषणा केली आहे. या कारची किंमत ५३ लाख (एक्स शोरुम ) इतकी जाहीर केली आहे. Volkswagen ची ही भारतातील सर्वात महागडी कार ठरली आहे. पण तरीही या कारला तुफान असा प्रतिसाद आहे.