ऑल टाईम Blockbuster..! 50 दिवस थिएटरमधून हलला नाही सिनेमा, कमाईत रचला इतिहास
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
All time blockbuster cimena: बॉक्स ऑफिसवर अनेक सिनेमे जोरात आपटतात तर काही सिनेमे घर करुन बसतात. काही सिनेमांची थिएटर ओसाड पडतात तोच काही सिनेमे 50 दिवसांपेक्षाही अधिक दिवस थिएटरवर राज्य करतात.
advertisement
advertisement
'पुष्पा 2: द रुल' हा ॲक्शन सिनेमा प्रदर्शित होऊन दीड महिने उलटली. बॉक्स ऑफिसवर अजूनही सिनेमा कलेक्शन करत आहे. गेल्या 50 दिवसांत 'पुष्पा 2: द रुल' ने देशभरात मोठा व्यवसाय केला आहे. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कब्जा केला होता. 'पुष्पा 2: द रुल'ने पहिल्या दिवशी जगभरात 294 कोटींची कमाई करून इतिहास रचला आहे. पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा हा भारतीय चित्रपट ठरला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement