Madhuri Dixit : 'तेव्हाही ती...' अशोक सराफांनी सांगितली माधुरी दीक्षितबद्दलची खास गोष्ट, म्हणाले...
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Ashok Saraf Madhuri Dixit Film : अशोक सराफ यांनी मुलाखतीत माधुरी दीक्षितसोबतच्या अनुभवांबद्दल सांगितले. 'अबोध' चित्रपटात त्यांनी माधुरीसोबत काम केलं होतं. यावेळी त्यांनी माधुरीचं खूप कौतुक केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
दरम्यान, १९८४ साली आलेला राजश्री प्रोडक्शनचा ‘अबोध’ हा माधुरी दीक्षितचा पहिलाच चित्रपट. यावेळी माधुरी केवळ दहावीमध्ये होती. अशोक सराफ यांनी त्यांच्या नव्या मुलाखतीत माधुरीसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. यावेळी त्यांनी माधुरीचा स्वभाव, ती आधी कशी होती आणि आता कशी आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या.
advertisement
मुलाखतीत बोलताना अशोक सराफ यांनी सांगितलं, "मी राजश्रीबरोबर ‘अबोध’ चित्रपट केला, त्यात माधुरी पण होती. तेव्हा ती शाळेत शिकत होती. अगदी साधी मुलगी, शांत बसली होती. तिचा चेहरा, तिचं सौंदर्य कमाल होतं. माधुरी दहावी-अकरावीत होती. तिच्या शाळेमुळे शूटिंगही थांबवण्यात आलं होतं. माधुरीला सुट्टी मिळाल्यानंतर आमचं शूटिंग सुरू झालं होतं."
advertisement
advertisement
अशोक सराफ यांच्या या वक्तव्यातून त्यांचं माधुरीसाठी असलेलं प्रेम आणि आदर दिसून येतो. माधुरी दीक्षित आणि अशोक सराफ यांनी ‘कोयला’, ‘प्रेम दीवाने’ या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. पण ‘येस बॉस’, ‘करण अर्जुन’, ‘सिंघम’, ‘कोयला’, ‘बेनाम बादशाह’ या हिंदी सिनेमांमधील अशोक मामांच्या भूमिका विशेष गाजल्या. काही दिवसांपूर्वीच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं असून ते सध्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत काम करत आहेत.


