8 वर्षांपूर्वीची क्राइम-थ्रिलर सीरिज, 2 सीझन आणि 19 एपिसोड, पण तरी स्टोरी अपूर्णच, आजही करतेय Netflix वर ट्रेंड

Last Updated:
Best Crime Thriller Series : ओटीटीवर आठ वर्षांपूर्वी आलेली एक क्राइम-थ्रिलर सीरिज आज ट्रेंड करतेय. या सीरिजचे 2 सीझन 19 एपिसोड आले असले तरी स्टोरी मात्र अपूर्णच आहे.
1/7
 ओटीटीच्या बदलत्या जगासोबतच लोकांची पसंतीही बदलत आहे. लोक आता चित्रपटांबरोबरच 8–10 एपिसोडच्या वेब सीरिज पाहायला जास्त पसंत करतात. मेकर्सही या सीरिजची कथा 2–3–4 सीझनपर्यंत वाढवत नेतात. पण कल्पना करा, जर एखादी सीरिज मधेच थांबली आणि प्रेक्षकांना हेच समजलं नाही की तिचा क्लायमॅक्स काय आहे किंवा कसा झाला असता? होय, आज आम्ही तुम्हाला अशाच एका हिट सीरिजबद्दल सांगणार आहोत.

advertisement
2/7
 कधी कधी काही कथा इतक्या प्रभावी असतात की त्या वाचून किंवा पाहून झाल्यानंतरही तुमचा विचार तिथेच अडकून राहतो. विशेषतः जेव्हा त्यात मोठे ट्विस्ट नसतात, पण हळूहळू वाढणारा तणाव तुम्हाला स्वतःच्या पद्धतीने विचार करायला भाग पाडतो.

3/7
 पात्रांमधील संवाद, वातावरण आणि छोट्या छोट्या तपशीलांमध्येच संपूर्ण कथेतला भार दडलेला असतो. ड्रामा कमी असतो, पण विचार अधिक खोल असतात. अशा कथा समजून घेणं सर्वात कठीण असतं. त्यात या कथेला शेवटच नसेल तर?

4/7
 आठ वर्षांपूर्वी आलेल्या एका सीरिजच्या क्लायमॅक्सची चाहते आजही आतुरतेने वाट पाहत आहेत. या सीरिजचा प्रभाव असा होता की लोक आजही तिला विसरू शकलेले नाहीत आणि म्हणूनच ती आजही ओटीटीवर ट्रेंड होत राहते. ही एक दमदार क्राइम-थ्रिलर सीरिज आहे, जी Joe Penhall यांनी तयार केली आणि David Fincher यांसारख्या दिग्दर्शकांनी तिला स्वतःची खास शैली दिली. यात अनेक ताकदीचे कलाकारही दिसतात.

5/7
 ओटीटीवरील या सीरिजची खरी ताकद म्हणजे जोनाथन ग्रॉफ, होल्ट मॅककॅलनी आणि अॅना टॉर्व यांची जोरदार कामगिरी. याशिवाय कॅमरॉन ब्रिटन सारख्या अभिनेत्यांनी खऱ्या सीरियल किलर्सची भूमिका इतक्या वास्तविकपणे साकारली की प्रेक्षकांना एकाच वेळी भीती आणि कुतूहल दोन्ही जाणवतं. ही सीरिज फार वेगाने पुढे जात नाही, पण मानवी मानसशास्त्राच्या थरांना ज्या खोलवर उलगडते, त्यामुळे ती खास बनते. या सीरिजचं नाव आहे ‘Mindhunter’, जी 2017 मध्ये ओटीटीवर रिलीज झाली आणि खूप लोकप्रिय झाली.

6/7
 'माईंडहंटर' या सीरिजची खासियत म्हणजे FBI च्या ‘Behavioral Science Unit’ च्या सुरुवातीचं वास्तववादी चित्रण. कथा दोन एजंट्सभोवती फिरते. एक वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा, तर दुसरा अनुभवांवर अवलंबून राहणारा. दोघेही त्यांची मानसिकता समजून घेण्यासाठी तुरुंगात असलेल्या खतरनाक सीरियल किलर्सशी संवाद साधतात. ही सीरिज जॉन ई. डग्लस आणि मार्क ओलशेकर यांनी लिहिली आहे. आतापर्यंत याचे 2 सीझन आणि 19 एपिसोड आले आहेत.

7/7
 'माईंडहंटर' या सीरिजला IMDb वर 8.6 रेटिंग मिळाले आहे. क्रिटिक्स आणि प्रेक्षक दोघांकडूनही तिला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. मात्र ही सीरिज 2020 मध्ये रोखण्यात आली आणि 2023 मध्ये अधिकृतपणे बंद करण्यात आली. तरीही प्रेक्षक आजही तिला मिस करतात. 2025 मध्ये तिच्या तिसऱ्या सीझनबद्दल चर्चा झाली, पण काहीही निश्चित झालं नाही. तरीही ‘Mindhunter’ आजही Netflix वर उपलब्ध आहे आणि सतत ट्रेंड करत राहते. कारण प्रेक्षकांना अशा प्रकारच्या ट्रू क्राइम आणि मनोवैज्ञानिक कथा खरोखरच आवडतात.

'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पुरावा काय? मोठी अपडेट
गौरीने वडिलांना फोटो पाठवले, कुटुंबावर आभाळ कोसळलं! मेसेजमध्ये होतं काय?
  • 'ते' पाहुन गौरी गर्जेच्या पायाखालची जमीन सरकली, वडिलांना WhatsApp वर पाठवलेला पु

View All
advertisement