'छावा' अजूनही गरजतोय! अल्लू अर्जुनलाही जमलं नाही ते विकीने करून दाखवलं, मोडला Pushpa 2 चा रेकॉर्ड!

Last Updated:
Vicky Kaushal Chhaava : छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा'ने प्रेक्षकांच्या मनात ठसठशीत स्थान मिळवलं आहे. चित्रपटाच्या कथानकासह विक्की कौशलच्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांना भारावून टाकलं.
1/7
या वर्षीच्या बॉक्स ऑफिसवर जर कोणत्या सिनेमाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतलं असेल, तर तो म्हणजे विक्की कौशल आणि रश्मिका मंदाना यांचा ऐतिहासिक चित्रपट 'छावा'. फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित झालेला हा सिनेमा आज 69 व्या दिवशीही थिएटरमध्ये धडकत आहे, आणि विशेष म्हणजे अजूनही तो लाखोंची कमाई करत आहे.

advertisement
2/7
'छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित 'छावा'ने प्रेक्षकांच्या मनात ठसठशीत स्थान मिळवलं आहे. चित्रपटाच्या कथानकासह विक्की कौशलच्या दमदार अभिनयाने आणि भव्यदिव्य दृश्यांनी प्रेक्षकांना भारावून टाकलं. यामुळेच हा सिनेमा थिएटरमधून हटण्याचं नाव घेत नाहीये.

3/7
Sacnilk.com च्या अहवालानुसार, 'छावा'ने आपल्या 69 व्या दिवशी भारतात सुमारे 6 लाख रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत हिंदी भाषेत या चित्रपटाने 601 कोटींचा गल्ला जमवला आहे.

4/7
साऊथमधील 15 दिवसांच्या प्रदर्शनातही या चित्रपटाने 15.87 कोटींची कमाई केली आहे. एकूण भारतात 'छावा'ने 602 कोटींच्या आसपास आणि वर्ल्डवाइड 807.78 कोटी रुपयांची ऐतिहासिक कमाई केली आहे.

5/7
जरी कमाईच्या आकड्यांमध्ये 'पुष्पा 2'ने आघाडी घेतली असली, तरी थिएटरमध्ये किती दिवस टिकला, या बाबतीत 'छावा'ने बाजी मारली आहे. अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' थिएटरमध्ये 56 दिवसांपर्यंत प्रदर्शित झाला, तर विक्की कौशलचा 'छावा' 69 दिवसांनंतरही स्क्रीन्सवर आहे आणि कमाई करत आहे.

6/7
आता प्रदर्शित होत असलेल्या मोठ्या चित्रपटांच्या गर्दीतही 'छावा' आपली जागा टिकवून आहे. सनी देओलच्या 'जाट' आणि अक्षय कुमारच्या 'केसरी 2'सोबत स्पर्धा करत असताना 'छावा'ने कासवाच्या गतीने का होईना, पण दररोज लाखोंची कमाई कायम ठेवली आहे.

7/7
विक्की कौशलचा सिनेमा वर्षातील सर्वाधिक काळ थिएटरमध्ये राहणारा सिनेमा ठरतोय. आता पाहावं लागेल की 800 कोटींचा टप्पा पार करून हा सिनेमा अजून किती दिवस कमाईचा झेंडा फडकवत राहतो!

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement