लेकीच्या जन्मानंतर रणवीर पहिल्यांदाच मोठ्या स्क्रिनवर, कसा आहे 'धुरंधर'; थिएटरमध्ये जाण्याआधी रिव्ह्यू वाचाच

Last Updated:
Dhurandhar Review : रणवीर सिंह अभिनीत 'धुरंधर' हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. तुम्ही चित्रपट पाहायचा विचार करत असाल तर 'धुरंधर'चा रिव्ह्यू वाचाच.
1/7
 'धुरंधर' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक'चे दिग्दर्शक आदित्य धर यावेळी काहीतरी वेगळं घेऊन येणार असा अंदाज होता. 'धुरंधर' हा चित्रपट रिलीजआधीपासूनच चर्चेत आहे. रणवीर सिंह, संजय दत्त, आर. माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन, राकेश बेदी, सौम्या टंडन हे कलाकार या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

advertisement
2/7
 'धुरंधर' हा सिनेमा ऑपरेशन 'धुरंधर'वर बेतलेला आहे. भारताच्या गुप्तचर विभागाच्या धाडसी कारवायांवर आधारित हा चित्रपट आहे. भारतातील विमान हायजॅक, 2001 मध्ये घडलेल्या संसद हल्ल्यासारख्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आधारित हा चित्रपट आहे. 'धुरंधर' या चित्रपटात रणवीर सिंहने एका धाडसी एजंटची भूमिका साकारली आहे. तर गुप्तचर प्रमुख यांच्या भूमिकेत अजय सन्याल आहे.

3/7
 'धुरंधर' ही फिल्म इंटेलिजंट फिल्म म्हणून ओळखली जाऊ शकते, कारण यामध्ये एकाच वेळी अनेक ट्रॅक्स चालतात जे एकमेकांशी जोडलेले असतात. पाकिस्तानच्या दुष्ट हेतूंना कसे देशाचे गुप्तचर नष्ट करतात, हे सर्व फिल्ममध्ये दाखवले आहे. यासाठी संसद हल्ला, मुंबईवरील दहशतवादी हल्ला, विमान हायजॅक, देशाला हानी पोहोचवण्यासाठी पाकिस्तान द्वारे बनवलेल्या बनावट नोट्स, तसेच पाकिस्तान आणि बलुचिस्तानमधील मतभेद आणि त्याचा भारतावर होणारा परिणाम अशा अनेक मुद्द्यांवर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात आला आहे.

4/7
 संसद हल्ल्याचे काही रिअल फुटेज देखील 'धुरंधर' या चित्रपटात वापरण्यात आले आहे. अनेक अॅक्शन आणि रक्तरंजित दृश्ये अंगावर शहारे आणणारे आहेत. फिल्म अनेक चॅप्टर्समध्ये विभागली गेली आहे. या फिल्ममध्ये अॅक्शन, भावना, देशभक्ती, संवादबाजी आणि सिनेमा उत्कृष्ट बनवण्यासाठी अनेक गोष्टींचा वापर करण्यात आला आहे.

5/7
 2008 मध्ये मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यादरम्यान हँडलर आणि दहशतवाद्यांमधील संवाद डोक्यला शॉट देणारे आहेत. जिओ स्टुडिओज आणि ज्योती देशपांडे यांचे कौतुक करणे गरजेचे आहे. कारण त्यांनी अशी फिल्म बनवली आणि ती दोन भागात प्रदर्शित केली आहे.

6/7
 रणवीर सिंहचा चित्रपटातील वावर खूपच भीतीदायक आहे. त्याचं काम उत्तम झालं आहे. रहमान बचोलच्या भूमिकेत दिसणाऱ्या अक्षय खन्नाच्या कामाचंही करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कमी संवाद असूनही एक्सप्रेशनच्या जोरावर त्याने प्रेक्षकांमध्ये विशेष स्थान निर्माण केलं आहे. एकंदरीत सर्वच कलाकारांची कामं चांगली झाली आहेत.

7/7
 आदित्य धर 'धुरंधर' या चित्रपटाचा निर्मिता आणि लेखक आहे. तो एक हुशार दिग्दर्शकच नव्हे तर बुद्धिमान लेखकदेखील आहे हे त्याने या चित्रपटाच्या माध्यमातून सज्ज केलं आहे. शाश्वत सचदेवचं संगीत आणि इरशाद कामिलचे बोल असं परफेक्ट कॉम्बिनेशन असलेलं या चित्रपटाचं म्युझिक आहे. बॅकग्राऊंड स्कोअरदेखील दमदार आहे. तुम्हाला देशभक्तीबाबतचे चित्रपट आवडत असतील तर तुम्ही 'धुरंधर' हा चित्रपट नक्की पाहा.

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement