VIDEO : बंदुकीतून गोळी सुटल्यागत बॉल गेला, पठ्ठयाने एका हाताने जबरदस्त कॅच घेतला, कॅच पाहून जॉन्टी रोड्स आठवेल!
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने मारलेला वायुवेगाने बाऊंड्रीच्या दिशेने जात असताना पठ्ठ्याने हवेत झेप घेऊन एका हाताने कॅच घेतली आहे. ही कॅच पाहुन सगळेच अवाक झाले आहेत.
Australia vs England Ashes Test : क्रिकेटच्या मैदानात अनेक अशा गोष्टी घडतात. या घटनांवर विश्वास ठेवायचा की नाही? असा प्रश्न नेहमीच पडतो. कारण मैदानातील कॅच आणि फिल्डिंग एखाद्याच्या विचार करण्याच्याही पलिकडे असतात. अशीच घटना आता अॅशेस टेस्ट मालिकेत घडली आहे. या घटनेत ऑस्ट्रेलियाच्या स्टिव्ह स्मिथने मारलेला वायुवेगाने बाऊंड्रीच्या दिशेने जात असताना पठ्ठ्याने हवेत झेप घेऊन एका हाताने कॅच घेतली आहे. ही कॅच पाहुन सगळेच अवाक झाले आहेत. या कॅचचा आता व्हिडिओ व्हायरल होत आहे.
खरं तर ही घटना 57 व्या ओव्हरला घडली आहे. इंग्लंडकडून ब्रायडन कार्स गोलंदाजी करायला आला होता. यावेळी कार्सच्या चौथ्या बॉलवर स्टीव्ह स्मिथ फ्लॅट बॉल मारला होता. या बॉलवर एखादा खेळाडू आऊट होईल असे वाटणार देखील नाही. पण आगीच्या वेगाने धावणाऱ्या याच बॉलला विल जॅक्सने एका हाताने धरत भन्नाट कॅच घेतली आहे. विशेष म्हणजे ही कॅच घेतल्यानंतर जॅक्सला विश्वास देखील बसला नाही.
advertisement
Will Jacks takes an absolute screamer to dismiss Steve Smith
One of the best catches you will ever see 🔥 pic.twitter.com/mj3VBVBcu9
— Jash (@JashViratian149) December 5, 2025
या भन्नाट कॅचमुळे चांगल्या लयीत खेळत असलेला स्टीव्ह स्मिथ 61 धावांवर बाद झाला होता. या कॅचचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.यासोबतच ब्रायडन कार्सने याच ओेव्हरच्या पहिल्या बॉलवर कॅमरन ग्रीनला 45 धावांवर क्लिन बोल्ड केले होते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे दोन्ही दिग्गज खेळाडू एकाचवेळी आऊट झाले होते.
advertisement
ऑस्ट्रेलियाच्या धावा सध्या 300 पार गेल्या आहेत आणि त्यांच्या पाच विकेट पडल्या आहेत. सध्या मैदानात जोश इंग्लीश आणि अॅलेक्स कॅरी मैदानात आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 05, 2025 4:14 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : बंदुकीतून गोळी सुटल्यागत बॉल गेला, पठ्ठयाने एका हाताने जबरदस्त कॅच घेतला, कॅच पाहून जॉन्टी रोड्स आठवेल!


