'मैं बिकाऊ नहीं हूं', 2 वर्षांनी सेटवर परतली बॉलिवूड हिरोईन, येताच इंडस्ट्रीच्या लोकांना झाप-झाप झापलं

Last Updated:
Richa Chadha: अभिनेत्री रिचा चढ्ढा गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटांपासून दूर होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर ती पूर्णपणे मम लाइफमध्ये रमली होती.
1/8
मुंबई: 'फुकरे ३' आणि 'हीरामंडी' मध्ये दिसलेली अभिनेत्री रिचा चढ्ढा गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटांपासून दूर होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर ती पूर्णपणे मम लाइफमध्ये रमली होती. आता जवळजवळ दोन वर्षांनंतर रिचा पुन्हा एकदा सेटवर परतली आहे, पण कामावर परतण्यापूर्वी तिने सोशल मीडियावर एक अत्यंत बोल्ड नोट शेअर केली आहे, ज्यात तिने इंडस्ट्रीतील फसवणूक आणि मातृत्वानंतरचे वास्तव मांडले आहे.
मुंबई: 'फुकरे ३' आणि 'हीरामंडी' मध्ये दिसलेली अभिनेत्री रिचा चढ्ढा गेल्या दोन वर्षांपासून चित्रपटांपासून दूर होती. गेल्या वर्षी जुलैमध्ये मुलीला जन्म दिल्यानंतर ती पूर्णपणे मम लाइफमध्ये रमली होती. आता जवळजवळ दोन वर्षांनंतर रिचा पुन्हा एकदा सेटवर परतली आहे, पण कामावर परतण्यापूर्वी तिने सोशल मीडियावर एक अत्यंत बोल्ड नोट शेअर केली आहे, ज्यात तिने इंडस्ट्रीतील फसवणूक आणि मातृत्वानंतरचे वास्तव मांडले आहे.
advertisement
2/8
रिचा चढ्ढाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि एक लांब नोट शेअर केली आहे, ज्यात ती आई झाल्यानंतरच्या भावनिक, शारीरिक आणि व्यावसायिक आव्हानांबद्दल खुलेपणाने बोलली आहे. ती म्हणाली,
रिचा चढ्ढाने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो आणि एक लांब नोट शेअर केली आहे, ज्यात ती आई झाल्यानंतरच्या भावनिक, शारीरिक आणि व्यावसायिक आव्हानांबद्दल खुलेपणाने बोलली आहे. ती म्हणाली, "रविवारी, मी जवळपास दोन वर्षांनंतर कामावर परतले. मला लवकर परत यायचं होतं, पण माझं शरीर, माझं मन यासाठी तयार नव्हते."
advertisement
3/8
रिचाने सांगितले की, बाळाच्या जन्मानंतर मानसिकरित्या सावरण्यासाठी तिला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला.
रिचाने सांगितले की, बाळाच्या जन्मानंतर मानसिकरित्या सावरण्यासाठी तिला अपेक्षेपेक्षा जास्त वेळ लागला. "प्रत्येक जण म्हणतो 'जास्त पोस्ट करा', 'जास्त कंटेंट बनवा', पण मी सोशल मीडियाची कर्मचारी नाही. माझंही एक आयुष्य आहे," असे तिने स्पष्टपणे सांगितले.
advertisement
4/8
या भावनिक प्रवासात रिचाला व्यावसायिक जीवनात आलेल्या वाईट अनुभवांबद्दलही तिने कठोर शब्दांत भाष्य केले आहे. तिने इंडस्ट्रीतील अनेकांकडून आलेल्या प्रोफेशनल धोकेबाजी आणि नैतिकतेच्या कमतरतेवर नाराजी व्यक्त केली. ती लिहिते,
या भावनिक प्रवासात रिचाला व्यावसायिक जीवनात आलेल्या वाईट अनुभवांबद्दलही तिने कठोर शब्दांत भाष्य केले आहे. तिने इंडस्ट्रीतील अनेकांकडून आलेल्या प्रोफेशनल धोकेबाजी आणि नैतिकतेच्या कमतरतेवर नाराजी व्यक्त केली. ती लिहिते, "मला जवळच्या लोकांनी दिलेला मोठा व्यावसायिक धोका सहन करावा लागला. मी शिकले आहे की या इंडस्ट्रीत खूप कमी लोकांमध्ये नैतिकता आणि धैर्य आहे."
advertisement
5/8
रिचाने अशा लोकांना डिमेंटर (जे जीवनातील आनंद शोषून घेतात) म्हटले. ती पुढे म्हणाली,
रिचाने अशा लोकांना डिमेंटर (जे जीवनातील आनंद शोषून घेतात) म्हटले. ती पुढे म्हणाली, "ज्या लोकांनी माझ्या सर्वात कठीण काळात माझ्यासोबत क्रूरता दाखवली, त्यांना कदाचित त्यांच्या आयुष्यात पुरेसे प्रेम मिळाले नसेल. मी माफ करते, पण कधीच विसरत नाही. कृपया जपून राहा, जर तुम्ही माझ्या वाटेत आलात तर. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहीत आहेच. भीती वाटतेय? चांगले आहे."
advertisement
6/8
रिचाने कंटेंट बनवण्याच्या दबावाचीही आलोचना केली.
रिचाने कंटेंट बनवण्याच्या दबावाचीही आलोचना केली. "एका आईला सावरण्यासाठी मोठ्या सपोर्ट सिस्टमची गरज असते, कारण बाळाच्या जन्मापूर्वी आपण कोण होतो, हे आईला आठवत नाही," असे ती म्हणाली. तिने शेवटी स्पष्ट केले, "जो दिखता हैं, वो बिकता हैं. पण मी 'बिकाऊ नाही'." रिचाने तिच्या या मनमोकळ्या पोस्टमधून इंडस्ट्रीतील दुटप्पीपणावर सडेतोड टीका केली आहे.
advertisement
7/8
रिचा चढ्ढाने लिहिले आहे,
रिचा चढ्ढाने लिहिले आहे, "जर एका बाळाला वाढवण्यासाठी संपूर्ण गावाची गरज असते, तर एका आईला सांभाळण्यासाठी खूप मोठ्या समर्थनाची गरज असते. कारण आईला हे आठवतच नाही की ती बाळाच्या जन्मापूर्वी कोण होती. मला माझ्या आयुष्याची छोटीशी झलकही शेअर करायची भीती वाटते, कारण मला कोणीतरी 'याबद्दल बोलण्यासाठी' पॉडकास्टमध्ये बोलावेल आणि कॅमेरे माझ्या प्रत्येक अश्रूवर झूम करतील."
advertisement
8/8
रिचा चढ्ढाने शेवटी लिहिले आहे,
रिचा चढ्ढाने शेवटी लिहिले आहे, "पोस्ट-पार्टम डिप्रेशनबद्दल बोलताना, त्याचे पोस्टर मुलाचा न बनवता का बोलता येत नाही? बॉडी पॉझिटिव्हिटीबद्दल बोलताना, स्वतःच्या स्ट्रेच मार्क्सचे क्लोज-अप फोटो न टाकता का बोलता येत नाही? आपण स्वतःला विचारले पाहिजे की, गोष्टी शेअर करण्यामागे आपला उद्देश काय आहे. दुसऱ्यांना एकटेपणा जाणवू नये म्हणून शेअर करणे महत्त्वाचे आहे का? की तुम्ही श्रीमंत व्हावे म्हणून शेअर करणे महत्त्वाचे आहे?"
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement