पाकिस्तानच्या कोणत्याही क्रिकेटपटूने असा कॅच घेतला नाही, कोणाला विश्वास बसेना; Video पुन्हा पुन्हा पाहिला
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
IND vs PAK: दुबईतील अंडर-19 आशिया कपच्या भारत-पाकिस्तान सामन्यात वेदांत त्रिवेदीचा विकेट सर्वात लक्षवेधी ठरली. पाकिस्तानच्या अहमद हुसेनने घेतलेल्या अफलातून झेलने सामना एका क्षणात रंगतदार झाला.
दुबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यात संडे ब्लॉक ब्लस्टर मॅच दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर सुरू आहे. 19 वर्षाखालील आशिया कप स्पर्धेतील या लढतीत प्रथम फलंदाजी करताना भारताने सर्व बाद 240 धावा केल्या. टीम इंडियाकडून ॲरॉन जॉर्जने सर्वाधिक 85 धावांची खेळी केली.
advertisement
त्याआधी पाकिस्तान संघाने टॉस जिंकून भारताला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करण्यास आलेल्या टीम इंडियाने नियमित अंतराने विकेट गमावल्या. त्यामुळे त्यांना संपूर्ण 50 ओव्हर फलंदाजी करता आली नाही. भारताचा डाव 46.1 ओव्हरमध्ये संपुष्ठात आला.
advertisement
मॅचच्या 20व्या षटकात अशी एक घटना घडली ज्या चर्चा संपूर्ण क्रिकेट विश्वात होत आहे. पाकिस्तानकडून 20वी ओव्हर निकब शफीक टाकत होता. तर वेदांत त्रिवेदी फलंदाजी करत होता. ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर पाकिस्तानच्या अहमद हुसेनने अफलातून झेल पकडत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
advertisement
भारताच्या वेदांत त्रिवेदीला बाद करताना त्याने बॅकवर्ड पॉइंटवर झेप घेत जॉन्टी रोड्सची आठवण करून देणारा झेल घेतला. ऑफ साइडवर स्क्वेअरच्या मागे उजवीकडे उडी मारत त्याने दोन्ही हातांनी चेंडू पकडला. हा झेल या स्पर्धेतील ‘कॅच ऑफ द टूर्नामेंट’ ठरेल अशी चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.
advertisement
CATCH OF THE TOURNAMENT SO FAR!! 🤯 pic.twitter.com/NZ66nIVj6h
— PCT Replays 2.0 (@ReplaysPCT) December 14, 2025
भारताकडून ॲरॉन जॉर्जशिवाय कनिष्क चौहानने 46 तर कर्णधार आयुष म्हात्रेने 38 धावांचे योगदान दिले. स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा धावा करण्यात अपयशी ठरला. तो फक्त 5 धावा करून बाद झाला.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 14, 2025 3:43 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
पाकिस्तानच्या कोणत्याही क्रिकेटपटूने असा कॅच घेतला नाही, कोणाला विश्वास बसेना; Video पुन्हा पुन्हा पाहिला











