माधुरी दीक्षितचा हिरो! एका फ्लॉपनं दिवाळं काढलं, बायकोसोबत टाकला असा डाव; बनला 'बडा' स्टार
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Bollywood Star Net worth : या अभिनेत्याने माधुरी दीक्षितसोबत अनेक लक्षात राहतील असे चित्रपट दिले. तो आज बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत स्टार्सपैकी एक आहे. परंतु 2000 च्या दशकात त्याचा एक चित्रपट फ्लॉप झाला आणि अभिनेता मागे पडला. त्याचे गरिबीचे दिवस सुरू झाले पण त्याच्या एका निर्णयाने त्याचं नशीब पुन्हा उजळलं.
80 च्या दशकात एक तरुण मुंबईच्या चाळीतून बाहेर पडला आणि बॉलिवूडचा फेमस अभिनेता झाला. त्याने प्रसिद्धीसोबतच भरपूर संपत्तीही मिळवली. त्याने एकामागून एक हिट चित्रपट दिले आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केलं. पण 90 च्या दशकात शाहरुख खान, सलमान खानसारखे नवीन कलाकार इतके लोकप्रिय झाले की त्याला साइड रोल करावे लागले. त्याने चित्रपट निर्मितीमध्ये हात आजमावला.
advertisement
advertisement
आपण बोलत आहोत तो अभिनेता म्हणजे जॅकी श्रॉफ जे आजही चित्रपटांमध्ये सक्रिय आहेत. ते अनेकदा सहाय्यक भूमिकांमध्ये दिसतात. 'बूम' चित्रपटाच्या अपयशानंतर जॅकीने त्यांच्या गरिबीबद्दल बोलले होते. परंतु त्यांनी वाईट काळ अतिशय हुशारीने हाताळला. 1994 मध्ये भारत सरकारने एक नवीन आर्थिक धोरण जाहीर केले. ज्यामुळे परदेशी कंपन्यांनी भारतीय केबल टेलिव्हिजन बाजारात प्रवेश केला.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
जेव्हा आयशा श्रॉफला विचारण्यात आले की तिला किती नफा झाला, तेव्हा ती म्हणाली, "जर मी कॉन्सेप्टद्वारे डील स्पष्ट केली तर त्या वेळी 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 100 कोटी रुपयांचा परतावा मिळाला होता." जॅकीच्या कुटुंबाने नफ्यातून चित्रपटांव्यतिरिक्त त्यांचे व्यवसाय साम्राज्य उभारले. हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, आज अभिनेत्याची एकूण संपत्ती सुमारे 400 कोटी रुपये आहे. स्पोर्ट्स लीग आणि हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री व्यतिरिक्त, त्याने इतर अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे. जॅकी श्रॉफ अलीकडेच 'हाऊसफुल 5', 'गुड बॅड अग्ली' आणि 'तन्वी द ग्रेट' मध्ये दिसले होते.


