कुत्र्यांसाठी थेट सुप्रीम कोर्टाशी भिडला जॉन अब्राहम, पत्र लिहित व्यक्त केला संताप, सपोर्टला आले जान्हवी-वरुण
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Supreme Court order on stray dogs : अभिनेता जॉन अब्राहमने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सरन्यायाधीश बीआर गवई यांना एक भावूक आणि कठोर पत्र लिहिलं आहे.
मुंबई: दिल्ली-एनसीआरमध्ये सध्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशामुळे मोठी चर्चा सुरू आहे. वाढत्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमुळे आणि रेबीजच्या वाढत्या प्रकरणांमुळे सर्व भटक्या कुत्र्यांना सार्वजनिक ठिकाणांहून हटवून त्यांना शेल्टरमध्ये ठेवण्याचा आदेश ११ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिला. पण या आदेशानंतर बॉलिवूडचे अनेक मोठे कलाकार कुत्र्यांच्या बाजूने उभे राहिले आहेत आणि त्यांनी या निर्णयावर जोरदार आक्षेप घेतला आहे.
advertisement
अभिनेता जॉन अब्राहमने सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सरन्यायाधीश बीआर गवई यांना एक भावूक आणि कठोर पत्र लिहिलं आहे. जॉनचं म्हणणं आहे की, हे कुत्रे 'भटके' नाहीत, तर दिल्लीतील कुटुंबांचा एक भाग आहेत, ज्यांना लोक प्रेम आणि आदर देतात. त्याने या आदेशाला २०२३ च्या 'अॅनिमल बर्थ कंट्रोल' नियमांच्या आणि न्यायालयाच्या पूर्वीच्या निर्णयांच्या विरोधात असल्याचं म्हटलं आहे, ज्यात कुत्र्यांना हटवण्याऐवजी त्यांची नसबंदी आणि लसीकरण करण्याचा सल्ला दिला होता.
advertisement
जॉनने पत्रात म्हटलं आहे की, जिथे 'एबीसी' कार्यक्रम प्रामाणिकपणे लागू झाला आहे, तिथे चांगले परिणाम दिसून आले आहेत. जयपूरमध्ये ७० टक्क्यांहून अधिक कुत्र्यांची नसबंदी झाली आहे, तर लखनऊमध्ये हा आकडा ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे कुत्र्यांचं वर्तन सुधारतं आणि रेबीजसारख्या रोगांचा धोकाही कमी होतो. कुत्र्यांना जबरदस्तीने हटवल्यास नवीन, लसीकरण न झालेले कुत्रे त्या भागात येतात, ज्यामुळे संघर्ष आणि धोका वाढतो.
advertisement
advertisement