गोवा - मुंबई विमान प्रवास, मराठी गायकाला पडला चांगलाच महागात; मोजावे लागले 4 लाख रूपये
- Published by:Minal Gurav
Last Updated:
विमानाने गोव्याहून मुंबईला येण्यासाठी प्रसिद्ध मराठी गायकाच्या खिशाला तब्बल 4 लाखांची कात्री लागली आहे. विमान प्रवासासाठी गायकाला इतके पैसे कसे लागले?
advertisement
advertisement
प्रसिद्ध मराठी गायक राहुल वैद्यबद्दल आपण बोलत आहोत. राहुल नुकताच गोव्याहून विमानानं मुंबईत आला. या विमान प्रवासासाठी त्याला तब्बल 4 लाख रुपये मोजावे लागले. त्याने एका स्टोरीमध्ये डोक्याला हात लावला आहे. त्याखाली त्याने लिहिलंय, "टेकऑफ करण्यासाठी आजचा दिवस तर सर्वात वाईट. उद्या रात्री कोलकात्यात आमचा शो आहे आणि अजूनही आम्ही तिथे कसं पोहोचणार आहोत, तेच माहिती नाही!"
advertisement
advertisement
advertisement
न्यूज 18 लोकमतशी बोलताना राहुलने घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. तो म्हणाला, "दुपारी 1.15 ची फ्लाइट होती आणि संध्याकाळी कलकत्त्याला शो होता. मला काही करून पोहोचायचं होतं. एक तास आधी फ्लाइट पोस्टपोन झाल्याचं सांगण्यात आलं. त्यानंतर आम्ही दुसऱ्या एअरपोर्टला गेलो. तिथे एअर इंडियाची फ्लाइट फुल होती. त्यांना रिक्वेस्ट करून, जी किंमत असेल त्याचं तिकिट द्या. एक इकोनॉमी तिकिट 40 हजार रुपये, बिझनेसक्लास तिकिट 70 हजार रुपये. इंडिगोसारखा मार्केट लीडर इतकं अनप्रोफेशनल कसं वागू शकतं, प्रवाशांना इतकं गृहीत कसं धरू शकतं हे मला कळत नाही. मी सध्या कामात असून मला वेळ मिळाल्यानंतर मी नक्कीच याची तक्रार करणार आहे."
advertisement
advertisement
advertisement
या संपूर्ण प्रकारावर इंडिगोने माफी मागितली. इंडिगोने गुरुवारी रात्री उशिरा अधिकृत निवेदन जारी केले. त्यांनी म्हटलं, "आम्ही आमच्या सर्व ग्राहकांना आणि भागधारकांना झालेल्या गैरसोयीबद्दल मनापासून माफी मागतो. आमचे पथक लवकरात लवकर सामान्यीकरण पुनर्संचयित करण्यासाठी MoCA, DGCA, BCAS, AAI आणि विमानतळ ऑपरेटर्ससोबत काम करत आहेत."


