बॉलिवूडमधून घेतला संन्यास, आता IPL मधून करतेय बक्कळ कमाई, प्रीती झिंटाची संपत्ती पाहून डोळे गरगरतील

Last Updated:
Preity Zinta Net Worth : 90 च्या दशकातील बॉलीवूड अभिनेत्री प्रीती झिंटा, 2008 मध्ये IPL मध्ये किंग्स इलेव्हन पंजाब टीमची मालकीण बनली. तिचं वैयक्तिक आयुष्य, संपत्ती आणि उद्योजकता यामुळे ती एक ग्लोबल आयकॉन आहे.
1/9
एका हसऱ्या चेहऱ्याने 90 च्या दशकात बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आणि लगेचच प्रेक्षकांच्या मनात घर केलं. 'दिल से' मधील तिचं छोटंसं पण लक्षवेधी पात्र असो, किंवा मग 'क्या कहना', 'कोई मिल गया', 'वीर-ज़ारा' सारख्या सुपरहिट चित्रपटांतील तिच्या भूमिका - प्रत्येक वेळी तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली. 90s ची ही क्यूट आणि बबली अभिनेत्री आहे प्रीती झिंटा!

advertisement
2/9
पण एक क्षण असा आला, जेव्हा प्रीतीने चमचमत्या रुपेरी पडद्यावरून ब्रेक घेतला. 2008 साली कोणालाही वाटलं नव्हतं की ही अभिनेत्री पुढे बिझनेस जगतात मोठी उडी घेणार आहे. पण IPL मध्ये प्रवेश करून प्रीतीने सर्वांना चकित केलं.

3/9
प्रीती झिंटा ही 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये एकटी महिला टीम मालकीण होती. किंग्स इलेव्हन पंजाब (आताची पंजाब किंग्स) या टीममध्ये तिने तीन भागीदारांसोबत मिळून गुंतवणूक केली होती.

4/9
ही टीम खरेदी करण्यासाठी त्यावेळी जवळपास 76 मिलियन डॉलर्स म्हणजेच सुमारे 622 कोटी रुपये खर्च झाले होते. आज, 2022 पर्यंत या टीमची किंमत पोहोचली आहे तब्बल 925 मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास 7,775 कोटी रुपये इतकी!

5/9
प्रीतीचं वैयक्तिक आयुष्यही इतकंच वैशिष्ट्यपूर्ण आहे. तिने लॉस एंजेलिसमध्ये राहणाऱ्या फायनान्शिअल अ‍ॅनालिस्ट जीन गुडएनफ यांच्याशी लग्न केलं. 2021 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून त्यांच्या आयुष्यात जुळी मुलं, एक मुलगा आणि एक मुलगी आले. आज ती बहुतेक वेळा अमेरिकेत राहते, पण IPL सुरू झालं की ती आवर्जून भारतात येते.

6/9
प्रीतीचा हा प्रवास फक्त सिनेमे आणि क्रिकेटपर्यंत मर्यादित नाही. तिच्या नावावर अनेक भव्य मालमत्ता आहेत. मुंबईत दोन आलिशान अपार्टमेंट्स, शिमल्यात एक सुंदर बंगला, ज्याची किंमत जवळपास 7 कोटी रुपये आहे.

7/9
हॉलीवूड सेलिब्रिटींनाही जिथे राहायला मिळत नाही अशा बेव्हरली हिल्स, USA येथे प्रीतीचा एक शानदार व्हिला आहे. तिचं प्रोडक्शन स्टुडिओ सुद्धा आहे, ज्याची अंदाजे किंमत 600 कोटी रुपये आहे.

8/9
गाड्यांच्या बाबतीतही ती काही कमी नाही. प्रीतीकडे Lexus LX 470, 58 लाखांची Mercedes Benz E-Class, BMW, Porsche यांसारख्या लक्झरी कार्सचा ताफा आहे.

9/9
आज प्रीती झिंटा ही केवळ अभिनेत्री नाही, तर एक प्रभावी उद्योजिका, क्रिकेट टीम मालकीण, आणि ग्लोबल आयकॉन म्हणून ओळखली जाते. चित्रपटातून सुरुवात करून आयपीएलच्या मैदानात आणि आंतरराष्ट्रीय स्टेजवर स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या प्रीतीची ही कहाणी तिच्या चाहत्यांना नक्कीच थक्क करणारी आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement