रजनीकांतपेक्षाही श्रीमंत आहे 'हा' साइड ॲक्टर, गरिबीत काढलं बालपण आता एवढ्या कोटींचा मालक
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
हा असा अभिनेता आहे जो 90 च्या दशकात जवळपास प्रत्येक चित्रपटात दिसला होता. या अभिनेत्याशिवाय सिनेमा पूर्ण होण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती.
हा असा अभिनेता आहे जो 90 च्या दशकात जवळपास प्रत्येक चित्रपटात दिसला होता. या अभिनेत्याशिवाय सिनेमा पूर्ण होण्याची कल्पनाही केली जाऊ शकत नव्हती. चित्रपटांमध्ये त्याच्यासाठी एक वेगळा ट्रॅक लिहिला गेला, जिथे तो आपल्या लोकांना पोट धरुन हसवायचा. अल्लू अर्जुन असो, चिरंजीवी असो, ज्युनियर एनटीआर असो, प्रभास असो किंवा महेश बाबू असो, अनेक चित्रपटांमध्ये तोच असायचा.
advertisement
रजनीकांत हे केवळ साऊथच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे. ज्याची गणना मेगा स्टार्समध्ये केली जाते. अनेक चित्रपट केलेले रजनीकांत आज एका चित्रपटासाठी 200 ते 250 कोटी रुपये भरमसाठ फी घेतात. पण तुम्हाला तो साईड हिरो माहित आहे का, जो चित्रपटात हिरो होण्याचे स्वप्न घेऊन आला होता पण चित्रपटात लीड हिरो बनू शकला नाही. आणि रजनीकांतपेक्षाही ज्याची संपत्ती जास्त आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ब्रह्मानंदमचा इंडस्ट्रीत कोणताही गॉडफादर नव्हता, पण त्याने हिंमत हारली नाही आणि स्वत:चा ठसा उमटवला. ब्रह्मानंदमला चित्रपटात आणण्याचे श्रेय दिग्दर्शक जांध्याला यांना जाते, ज्यांनी 'अहा ना पेलांता' चित्रपटात अभिनेत्याला संधी दिली. चिरंजीवीला ब्रह्मानंदमची कॉमिक टायमिंग आवडली आणि त्यानंतर त्यांनी अनेक आगामी चित्रपटांमध्ये अभिनेत्याला संधी दिली.
advertisement
यानंतर अभिनेत्याने एकामागून एक चित्रपट करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. साऊथ फिल्म इंडस्ट्रीत नागार्जुनपासून रजनीकांत, अल्लू अर्जुन, राम चरण आणि चिरंजीवीपर्यंत अनेक मोठे स्टार्ससोबत काम केलं. पण ब्रह्मानंदम यांनी या सर्वांमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. ब्रह्मानंदम यांची गणना भारतातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या विनोदी अभिनेत्यांमध्ये केली जाते. पद्मश्रीसारखा सर्वोच्च सन्मानही मिळाला आहे.
advertisement
ब्रह्मानंदमने आपल्या 39 वर्षांच्या कारकिर्दीत 1100 चित्रपट केलं आहे आणि ते रजनीकांतपेक्षाही श्रीमंत आहेत. 'नेट वर्थ ग्यान'नुसार, 2024 मध्ये ब्रह्मानंदम यांची एकूण संपत्ती सुमारे 550 कोटी रुपये असेल. त्याचवेळी रजनीकांत यांची एकूण संपत्ती 430 कोटी रुपये आहे. ब्रह्मानंदमची बहुतेक कमाई चित्रपट आणि जाहिरातींमधून येते.
advertisement