खिडकीत जुळले प्रेमाचे सूर! कोण आहे वैशाली सामंतचा नवरा? गायिकेला नववीत असतानाच करायचं होतं त्याच्याशी लग्न
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Singer Vaishali Samant Love Story : गायिका वैशाली सामंत गेली अनेक वर्ष आपल्या गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकतेय. पण नववीन असताना वैशालीचं मन जिंकणारा तिचा नवरा कोण? वैशालीला त्याच्याशी नववीन असतानाच लग्न करायचं होतं.
गेली अनेक वर्ष मराठी इंडस्ट्रीवर आपल्या आवाजाची छाप उमटवणारी प्रसिद्ध गायिका वैशाली सामंत. मालिकेचं शीर्षक गीत असो किंवा सिनेमातील गाणी, वैशाली सामंतनं तिच्या आवाजाने प्रेक्षकांची मनं जिंकली. पण कोण होता तो ज्याने नववीत असतानाच वैशालीचं मनं जिंकलं होतं. त्याच्या प्रेमात पडलेल्या वैशालीला नववीत असतानाच लग्न करायचं होतं. कोण आहे वैशाली सामंतचा नवरा? दोघांची खिडकीत सुरू झालेली हटके लव्ह स्टोरी माहितीये का?
advertisement
दत्तात्रय सामंत असं वैशालीच्या नवऱ्याचं नाव आहे. दूरदर्शनच्या मुलाखतीत बोलताना वैशाली आणि दत्तात्रय यांनी त्यांची लव्ह स्टोरी सांगितली. वैशाली म्हणाली, "मी शाळेत होते आणि तो कॉलेजमध्ये होते. ते नुकतेच पार्ल्यात राहायला आले होते. माझ्या घरासमोर याचं घर होतं. आमने सामने असं झालं. बोलणं सुरू झालं."
advertisement
दत्तात्रय यांनी सांगितलं, "मी हिला समोर बघून फोन करायचो. खिडकीतून दिसायचं. समोर कोणी नाही ना. असं सगळं घडत घडत त्याला सीरियस वळण लागलं. मग आम्ही डिक्लर केलं की आम्हाला लग्न करायचं आहे." वैशालीने सांगितलं, "नववीत असताना मी घरी सांगून टाकलं की मला याच्याशी लग्न करायचं आहे. आई वडील शॉक होते. ते म्हणाले अजून तुमचा भातुकलीचा खेळ संपला नाहीये."
advertisement
advertisement
वैशाली पुढे म्हणाली, "लग्नाचं सांगितल्यानंतर घरचे म्हणाले, तुम्हाला स्वत:ला काही कळत नाही आणि लग्न वगैरे कुठे. पण थोड्या काळाने त्यांना कळलं की हे सीरियस आहेत. त्यांनी सांगितलं की आधी शिक्षण करा. माझं मास्टर्स होई पर्यंत आम्ही बाहेर फिरायला लागलो होतो. त्यामुळे घरच्यांनी माझ्या मास्टर्सच्या पहिल्या वर्षानंतर सांगितलं की, यांना लग्नाच्या बंधनात अडकवणं योग्य आहे. आम्ही रितसर पार्ल्याच्या टिळक मंदिरात आमचं लग्न झालं."
advertisement
दत्तात्रय यांनी वैशालीच्या संपूर्ण गाण्याच्या करिअरमध्ये तिची मोठी साथ दिली. ते कायम तिच्या पाठीशी खंबीर उभे होते. वैशालीने सांगितलं, "आम्ही दोघे कॉलेज कॉम्पिटशन फेस करायचो. पण जेव्हा खरंच निवडायची वेळ आली गाणं की टिपिकल जॉब तेव्हा माझ्याआधी याच्या डोक्यात क्लिअर होतं की ही सिंगर बनणार. मला ती वाट कठीण वाटत होती कारण लग्न झालं आहे. तो सिविल इंजिनिअर आहे, त्याचंही करिअर सुरू झालं आहे."
advertisement
advertisement


