Suraj Chavan Wedding guests : अशोक मामा, अक्षय कुमार ते अजित दादा, सूरज चव्हाणच्या लग्नाला कोण कोण येणार? पाहुण्यांची लिस्ट
- Published by:Minal Gurav
Last Updated:
Suraj Chavan Wedding guests List : सूरज चव्हाणच्या लग्नासा काही तास उरले आहेत. राजकीय मंडळींपासून सेलिब्रेटींपर्यंत सूरज चव्हाणच्या लग्नाला कोण कोण हजेरी लावणार त्या पाहुण्यांची लिस्ट समोर आली आहे.
'बिग बॉस मराठी'च्या पाचव्या पर्वाचा विजेता सूरज चव्हाण त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतोय. सूरजच्या आयुष्याती दोन मोठ्या क्षणांचा आनंद तो साजरा करत आहे. नुकतंच त्याचं नवं आलिशान घर पूर्ण झालं. आज 29 नोव्हेंबर रोजी सूरज चव्हाण त्याच्या मामाची मुलगी संजना गोफणे हिच्याशी लग्न करतोय. त्यांच्या लग्नाआधीच्या विधींना सुरुवात देखील झाली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
बिग बॉस मराठी सीझन पाचची संपूर्ण टीम सूरजच्या लग्नाला येणार आहे. ज्यात अभिजीत सावंत, अंकिता वालावलकर, आर्या जाधव, ईरिना, निक्की तांबोळी, घनश्याम दरोडे, अरबाज पटेल, निखिल दामले, धनंजय पवार, पुरुषोत्तमदादा पाटील, जान्हवी किल्लेकर, वैभव चव्हाण, संग्राम चौघुले, योगिता चव्हाण हे कलाकार उपस्थित राहाणार आहेत. तसंच चंदन कांबळे, उत्कर्ष शिंदे, कुणाल भगत यांचीही उपस्थिती असणार आहे.
advertisement


