Suhani Bhatnagar Death : 'दंगल गर्ल' सुहानीच्या मृत्यूचे कारण आहे हा घातक त्वचा रोग, पाहा याची लक्षणं आणि कारणं
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Dangal Girl Suhani Bhatnagar Death Cause : दंगल चित्रपटात आमिर खानची मुलगी म्हणजेच बबिता फोगटची भूमिका साकारणारी सुहानी भटनागर हिचे दुःखद निधन झाले आहे. ती फक्त 19 वर्षांची होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहानी भटनागर डर्माटोमायोसायटिसने त्रस्त होती. चला जाणून घेऊया हा आजार इतका धोकादायक कसा ठरतो.
दंगल चित्रपटात काम केलेल्या सुहानी भटनागरचे अवघ्या 19 व्या वर्षी निधन झाले. अखेर सुहानी भटनागरचा इतक्या लहान वयात या त्वचारोगाने मृत्यू कसा झाला? मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुहानी डर्माटोमायोसायटिसने त्रस्त होती. या आजाराची लक्षणं खूप सामान्य दिसतात. त्यामुळे हा आजार कधी धोकादायक बनतो, हे कळत नाही. सुहानीला 11 दिवसांपूर्वी एम्समध्ये दाखल केले गेले होते. टेस्टमधून तिला डर्मेटोमायोसिसचा त्रास असल्याचे दिसले.
advertisement
डर्माटोमायोसिटिस म्हणजे काय? : मेयो क्लिनिकच्या मते, डर्माटोमायोसिटिस हा एक दुर्मिळ असामान्य आजार आहे, जो सामान्यतः पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त आढळतो. यामध्ये व्यक्तीची रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होते. स्टिरॉइड्स हाच त्याचा उपचार आहे पण रोगप्रतिकारशक्तीवर आणखी परिणाम होण्याचा धोका असतो. या आजारात पेशींमध्ये जळजळ होते, ज्यामुळे स्नायू झपाट्याने कमकुवत होऊ लागतात आणि त्वचेवर पुरळ उठू लागते.
advertisement
डर्माटोमायोसिटिसची लक्षणे : डर्माटोमायोसिटिसची लक्षणे एकतर खूप उशीरा दिसतात किंवा अचानक दिसू शकतात. सहसा त्याचे पहिले लक्षण त्वचेतील बदलांपासून सुरू होते. त्वचा प्रथम व्हायलेट किंवा डस्की रंगात बदलू लागते. त्यामुळे त्वचेवर रॅशेस दिसू लागतात. हे पुरळ सहसा चेहऱ्यावर आणि डोळ्याभोवती दिसतात. रॅशेसमुळे खाज आणि वेदना होतात.
advertisement
advertisement
डर्माटोमायोसिटिसची कारणे : मेयो क्लिनिकच्या मते, डर्माटोमायोसिटिसची कारणे अद्याप माहिती नाहीत. पण हे ऑटोइम्यून डिसऑर्डरसारखेच आहे. यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती चुकून त्याच्या निरोगी ऊतींवर हल्ला करू लागते. अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटक देखील याचे कारण असू शकतात. पर्यावरणीय कारणांमध्ये विषाणूचा संसर्ग, तीव्र सूर्यप्रकाश, काही औषधे आणि धूम्रपान हे देखील याचे कारण असू शकते.
advertisement
advertisement