Drinking Water While Eating : जेवताना प्यायलेलं पाणी विषसमान, असं का म्हणतात तज्ज्ञ? जाणून घ्या यामागचं सत्य
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Rules For Drinking Water : निरोगी राहण्यासाठी भरपूर पाणी पिणं खूप गरजेचं असतं. म्हणूनच माणसाला रोज 2-3 लिटर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण तुम्हाला माहित आहे का? पाणी पिण्याची पण योग्य वेळ असते. आयुर्वेदामध्ये पाणी पिण्याच्या योग्य वेळा सांगितल्या आहेत. त्याचबरोबर कोणती वेळ पाणी पिण्यासाठी अगदी चुकीची आहे हेदेखील सांगितले आहे. चला पाहूया जेवताना पाणी पिऊ नये असे तज्ज्ञ का म्हणतात.
अनेक जणांना जेवताना पाणी पिण्याची सवय असते. जेवढे अन्न हे लोक खातात, त्यापेक्षा जास्त पाणी पितात. असे केल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. याशिवाय पोटाशी संबंधित अनेक समस्याही उद्भवू शकतात. यामुळेच आयुर्वेदात जेवताना पाणी न पिण्याचा सल्ला देण्यात आला आहे. डॉ. सर्वेश कुमार यांनी जेवताना पाणी का पिऊ नये आणि केव्हा प्यावे याबद्दल माहिती दिली आहे.
advertisement
advertisement
advertisement
तुम्ही जेवताना जे पाणी पितात ते तुमच्या पोटाच्या पृष्ठभागाद्वारे शोषले जाते. पचनासाठी आवश्यक द्रव घट्ट होईपर्यंत पाणी शोषण्याची ही प्रक्रिया चालू राहते. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने हा द्रव अन्नापेक्षा घट्ट होतो. अशा स्थितीत अन्न पचवण्यासाठी गॅस्ट्रिक ज्यूस तयार होऊ लागतो, ज्यामुळे अपचन, गॅस आणि छातीत जळजळ होऊ लागते.
advertisement
advertisement
advertisement










