दही साखर घालून खावं की मीठ? आयुर्वेद काहीतरी वेगळंच सांगतं...
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
ऋतू कोणताही असो, दही आपण वर्षांच्या 12 महिन्यांतून कधीही खातो. उन्हाळ्यात तर दही आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं कारण त्यामुळे पोटात गारवा निर्माण होतो. अन्नपचनही व्यवस्थित होतं. (अनंत कुमार, प्रतिनिधी)
advertisement
दह्यात साखर मिसळून खाल्ल्यास वजन वेगाने वाढण्याची शक्यता असते, जे मधुमेहाच्या रुग्णांसाठी घातक आहे. त्यामुळे साखरेपेक्षा दह्यात मीठ मिसळून खाल्ल्यास उत्तम. मीठामुळे अन्नपचन व्यवस्थित होतं. परंतु उच्च रक्तदाब म्हणजेच हाय ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर मीठ खाऊ नये. नाहीतर बीपी आणखी वाढण्याची शक्यता असते. शिवाय स्ट्रोक आणि हायपरटेंशन असा त्रासही होऊ शकतो, असं डॉक्टर सांगतात.
advertisement
advertisement
आयुर्वेद सांगतं की, प्रयत्न करा दही जसं आहे तसंच खाण्याचा. त्यात काहीच मिसळू नका. जर तुम्हाला तसं दही अजिबात आवडत नसेल तर नाश्त्याच्या वेळी त्यात साखर मिसळून खाऊ शकता. परंतु दुपारी किंवा रात्री मात्र मीठच मिसळून खा. रात्री तर अजिबात दही खाऊ नये. शिवाय दररोज दही खाऊ नये. तसंच कधीतरी दह्यात मूग डाळ, मध, तूप किंवा आवळा मिसळून खाल्ल्यास आरोग्यासाठी फायदेशीर ठरतं.
advertisement