Astrology: शुभकार्यापूर्वी दही-साखर आवर्जून खाता, पण त्यामागचा नेमका उद्देश माहितीये?

Last Updated:
आपल्या देशात अशा अनेक परंपरा वर्षानुवर्षे सुरू आहेत, ज्यांमागे नेमकं काय कारण आहे हेच आपल्याला माहित नसतं. कोणत्याही शुभकार्यापूर्वी दही-साखर खाणं हीसुद्धा त्यापैकीच एक प्रथा. यामागे नेमका काय अर्थ आहे, जाणून घेऊया. (अभिनव कुमार, प्रतिनिधी / दरभंगा)
1/5
ज्योतिषाचार्य डॉ. कुणाल कुमार झा यांनी सांगितलं की, प्रवासाला जाताना दही साखर खाऊन जाण्याची परंपरा फार पूर्वापार चालत आली आहे. हिंदू धर्मात दही खाऊन प्रवासाला निघणं अत्यंत शुभ मानलं जातं. दही खाल्ल्याने पोट थंड आणि शांत राहतं.

advertisement
2/5
दह्याला पंचामृत मानलं जातं, त्यामुळे प्रत्येक शुभ कार्यात त्याचा आवर्जून वापर करतात. ज्योतिषशास्त्रात दह्याचा संबंध चंद्राशी असल्याचं सांगितलंय. दह्याचा रंग पांढरा असल्यामुळे चंद्राला ते प्रचंड आवडतं. म्हणूनच ग्रहणात अनेक भागात दह्याचे पदार्थ बनवले जातात.

3/5
 डॉ. कुणाल कुमार झा यांनी सांगितलं, दही खाल्ल्याने आपल्या आजूबाजूची सगळी  हळूहळू नष्ट होते. म्हणूनच अगदी लहानपणापासून कोणत्याही ला जाताना आई आपल्याला दही-साखर देते.
डॉ. कुणाल कुमार झा यांनी सांगितलं, दही खाल्ल्याने आपल्या आजूबाजूची सगळी नकारात्मक ऊर्जा हळूहळू नष्ट होते. म्हणूनच अगदी लहानपणापासून कोणत्याही शुभकार्याला जाताना आई आपल्याला दही-साखर देते.
advertisement
4/5
आरोग्यासाठीही दही अत्यंत उपयुक्त असतं. दह्यामुळे पचनशक्ती भक्कम होते. दह्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, शिवाय व्हिटॅमिन B2 आणि व्हिटॅमिन B12ने दही परिपूर्ण असतं. तसंच यात असलेल्या पोटॅशियम आणि मॅग्नेशियमचा आरोग्याला प्रचंड फायदा होतो.

5/5
 (सूचना : येथे दिलेली माहिती  श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement