राहू-मंगळ आलेत एकत्र, काळजी घ्या! पदोपदी अपघाताची शक्यता
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
सूर्यमालेतील ग्रहांचे मानवी जीवनावर चांगले-वाईट परिणाम होत असतात, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. पाटण्याचे प्रसिद्ध ज्योतिषी डॉ. राजनाथ झा म्हणतात की, ग्रहांच्या हालचालींचा मानवी जीवनावर परिणाम होतोच, शिवाय निसर्गातही बरीच उलथापालथ होते. (उधव कृष्ण, प्रतिनिधी / पाटणा)
डॉ. झा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतिषशास्त्रात राहू ग्रहाला आपत्ती, भय आणि अंधाराचा कारक मानलं जातं. जेव्हा राहू आणि मंगळ ग्रह एकत्र येतात, तेव्हा 'अंगारक योग' तयार होतो. सध्या राहू मीन राशीत विराजमान आहे, तिथे मंगळ ग्रहाचाही प्रवेश झालाय. या युतीलाच म्हणतात 'अंगारक योग', जी आता 1 जूनपर्यंत अशीच राहणार आहे.
advertisement
advertisement
advertisement
राजनाथ झा यांनी सांगितलं की, अंगारक योगाचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांड आणि संकटमोचन हनुमान अष्टकाचं नियमित पठण करावं. त्यामुळे मारुतीरायांच्या आशीर्वादाने या योगाचा प्रभाव कमी होऊन आयुष्य संतुलित राहतं. समस्यांपासून मुक्ती मिळते आणि अपघात टळतात, अशी माहिती ज्योतिषांनी दिली.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)