मिमिक्रीच्या माध्यमातून चहावाला करतो ग्राहकांचे मनोरंजन, इथली चहा पिली की मूड होतो एकदम फ्रेश
- Published by:News18 Marathi
- Reported by:Saiprasad Nagesh Mahendrakar
Last Updated:
या ठिकाणच्या छोट्याशा चहाच्या टपरीवर चहाप्रेमींची गर्दी आणि चहावाल्याकडून आलेल्या ग्राहकांची विविध नेते, अभिनेते, राजकीय मंडळींच्या आवाजात केलेली करमणूक पाहायला मिळत असते.
प्रामाणिकपणे कष्ट केल्यास आपल्या कष्टाचे चीज नक्कीच होते. हेच कोल्हापूरच्या एका चहावाल्याने दाखवून दिले आहे. सध्या कित्येक प्रसिद्ध चहाची दुकाने आपल्या आसपास पाहायला मिळतात. मात्र त्यातही आपल्या छोट्याशा गाड्यावर मिळणाऱ्या चहाला प्रसिद्ध करण्यात या चहावाल्याने यश मिळवले आहे. आलेल्या कित्येक अडचणींवर मात करत त्याने स्वतःचा एक चांगला व्यवसाय सुरू केला आहे.
advertisement
<a href="https://news18marathi.com/maharashtra/kolhapur/">कोल्हापूरच्या</a> खासबाग मैदाना समोर केएमटी बस स्टॉपच्या मागे सर्वत्र गवती चहाचा घमघमाट सुटलेला असतो. या ठिकाणच्या छोट्याशा चहाच्या टपरीवर चहाप्रेमींची गर्दी आणि चहावाल्याकडून आलेल्या ग्राहकांची विविध नेते, अभिनेते, राजकीय मंडळींच्या आवाजात केलेली करमणूक पाहायला मिळत असते.
advertisement
अशाच वातावरणात किशोर साळोखे यांनी गेली 7 ते 8 वर्षे आपला चहाचा व्यवसाय मोठा केला आहे. संधिवाताच्या त्रासमुळे मान अडकलेली असतानाही किशोर यांनी मोठ्या जिद्दीने एकट्याने हा त्यांचा व्यवसाय उभा केला आहे. आज कोल्हापुरात काही ठराविक ठिकाणीच फक्कड गवती चहा मिळतो. त्यापैकीच एक ठिकाण म्हणजे किशोर यांचे चहाचे दुकान आहे, असे किशोर अभिमानाने सांगतात.
advertisement
खरं तर लहानपणापासून किशोर साळोखे हे सोनार काम करत असत. कित्येक वर्ष खाली मान करुन सोनार काम केल्यामुळे त्याचबरोबर संधिवाताच्या त्रासामुळे काही वर्षांपूर्वी त्यांना मानेचा त्रास सतावू लागला. त्यांची मान अडकली असल्याने नीट वळवता येत नाही. अशात डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना सोनार काम सोडून द्यावे लागले.
advertisement
त्यानंतर काही ना काही व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांनी चहाची टपरी सुरू केली. सुरुवातीला इलायची चहा विकणाऱ्या किशोर यांनी स्वतःची एक विशेष ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने फक्त गवती चहाविक्री सुरू केली होती. आज प्रत्येक चहाप्रेमीला या ठिकाणी मिळणारा गवती चहा आवडतो. रोजच्या रोज हा चहा प्यायला बरेचजण येत असतात, असे किशोर यांनी सांगितले आहे.
advertisement
हा चहा बनवताना सुरुवातीला दुधात थोडेसे पाणी टाकून उकळायला ठेवले जाते. त्यातच गवती चहाची पाने कापून टाकली जातात. त्याला उकळी फुटल्यानंतर त्यामध्ये चहापूड आणि साखर टाकली जाते. चहा तयार होऊन गवती चहाचा संपूर्ण अर्क त्या चहामध्ये उतरण्यासाठी त्याला भरपूर उकळावे लागते. तेव्हाच हा स्पेशल गवती चहा तयार होतो.
advertisement
किशोर हे एक कलाकार देखील आहेत. नेते, अभिनेते, राजकीय मंडळी, पक्षांचे, प्राण्यांचे तसेच वाहनांच्या आवाजांच्या नकला देखील ते करतात. कधी कधी ते स्वतः मिमिक्रीचे शो देखील करत असतात. त्यात बऱ्याचदा येणाऱ्या ग्राहकांचे देखील मिमिक्रीच्या माध्यमातून ते मनोरंजन करत असतात. त्यामुळेच त्यांनी स्वतःच्या चहाची टॅगलाईन मूडचा टर्निंग पॉईंट अशी ठेवली आहे.
advertisement


