फक्त 30 रुपयांत जेवणाची थाळी, दररोज 700 लोक इथं करतात पोटभर जेवण, PHOTOS
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
पुण्यातील अनिल आपटे हे गेल्या अनेक वर्षांपासून कुमठेकर रोड याठिकाणी श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र चालवत आहेत. विशेष म्हणजे फक्त 30 रुपयांत मिळणाऱ्या जेवणासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागतात.
advertisement
advertisement
बाहेर गावावरून जी मुलं शिक्षणासाठी पुण्यात येतात त्यांच्याकडे मोजकेच पैसे असतात. शिक्षण सांभाळत जर जेवणाचा खर्च कमी झाला तर यासाठी आपण काही तरी करू शकतो, अशी कल्पना अनिल आपटे यांच्या डोक्यात आली. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय असल्यामुळे त्याला जोड देत श्री स्वामी समर्थ पोळी भाजी केंद्र 2017 मध्ये सुरु केले. जवळपास गेली 7 वर्ष ते चालवत आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement