उन्हाळ्यात जास्त वेळ उपाशी राहिल्याने मायग्रेन होतो का? डॉक्टरांनी दिलं तुमच्या मनातल्या प्रश्नाचं उत्तर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
उन्हाळ्याच्या कडाक्यात कष्टाची कामे करणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. कारण प्रखर उन्हामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.
advertisement
advertisement
मायग्रेनची लक्षणे काय? नेहमी प्रखर सूर्यप्रकाशाच्या सान्निध्यात राहिल्यास मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. तसेच सतत थंड पाण्याने पिल्याने देखील अर्धे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ही अर्धे डोकेदुखी ही अतिशय तीव्र स्वरूपाचीदेखील असू शकते. एखाद्या व्यक्तीस तीव्र स्वरूपाचा उग्र वासदेखील मायग्रेनसाठी कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे उग्र वासापासून दूर राहायला हवे.
advertisement
उन्हाची तीव्रता जास्त असते तेव्हा या उन्हामुळे चाळे फटफट करतात. नरड्याला कोरड पडते, जास्त वेळ उपाशी राहिल्यामुळे मायग्रेनचा त्रास उदभवण्याची दाट शक्यता असते. अनेकदा जेवणाच्या वेळेला चहा किंवा नाश्ता करून अर्धपोटी उपाशी राहण्याची सवय झालेली असते. मात्र या सवयीमुळे त्यांना मायग्रेनसारख्या आजारास सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे जास्त वेळ उपाशीपोटी राहणे टाळले पाहिजे.
advertisement
advertisement
advertisement
जास्त वेळ उन्हात राहिल्याने चाळे फटफट करणे, अर्धे डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. ज्यांना वासाची अॅलर्जी आहे अशा व्यक्तींनी उग्र वासाच्या संपर्कापासून दूर राहावे, तीव्र स्वरूपात डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असंही जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राजेंद्र गाडेकर यांनी सांगितले.