ओठांचा काळसरपणा दूर करण्यासाठी जबरदस्त उपाय! तुमचेही ओठ दिसू शकतात गुलाबी, मऊ, सुंदर
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
Lips Care: आजकाल आयुष्य प्रचंड धावपळीचं झालंय. अशात 8 तासांची पुरेशी झोप घेणं म्हणजे मोठा टास्कच वाटतो. दिवसभरातून तीनही वेळेला घरचं सकस अन्न मिळणंसुद्धा अवघडच. त्यामुळे शरीराला पुरेसे पौष्टिक तत्त्व मिळत नाहीत. त्यात वाढत्या प्रदुषणामुळे शरीराचे हाल होतात. ओठ काळे पडण्याची समस्या तर सध्या प्रचंड वाढलीये. परंतु आपण घरच्या घरी काही सोपे उपाय करून निश्चितच ओठांचा नैसर्गिक गुलाबी रंग मिळवू शकतो. तसंच यामुळे ओठ छान मऊसर राहू शकतात. (आकाश कुमार, प्रतिनिधी)
तज्ज्ञांनी दिलेल्या टिप्सनुसार, मधात लिंबाचा रस मिसळून ओठांवर लावून रात्रभर तसंच ठेवावं. यामुळे ओठांवरील काळसरपणा हळूहळू दूर होतो. साखर आणि मधानं ओठांवर स्क्रबही करू शकता. या स्क्रबने हलक्या हातानं ओठांना मसाज करावं. त्यामुळे ओठांवरील डेड स्किन निघून जाते आणि ओठ छान चमकदार दिसतात. तसंच बिटाचा रस दररोज रात्री ओठांवर लावल्यास ओठ हळूहळू गुलाबी होतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement